Ranjitsinh Disale Saam Tv
महाराष्ट्र

डिसले गुरुजींबाबत नवा खुलासा, जागतिक बॅंकेच्या मेलमुळे संभ्रम

विश्वभुषण लिमये

सोलापूर - ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) गुरुजींची जागतिक बँकेवर शिक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याचं समोर आलं होतं. जून २०२१ ते जून २०२४ या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आल्याचं डिसले गुरुजींनी (Disale Guruji) सांगितलं होतं. याबाबत एका व्यक्तीनं जागतिक बँकेकडे चौकशी केली असता वेगळीच माहिती समोर आली आहे. जागितक बँकेच्या (Bank) मेलमुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

हे देखील पहा -

वैभव कोकाटे नावाच्या व्यक्तीनं जागतिक बँकेला इमेल करून रणजितसिंह डिसले गुरुजींच्या नियुक्तीबाबत चौकशी केली होती. त्यांना जागतिक बँकेकडून उत्तर मिळाले असून आमच्याकडे रणजितसिंह डिसलेंना जागतिक बँकेवर सल्लागार म्हणून नियुक्त केल्याचा कुठलाही रेकॉर्ड नाही, असं जागतिक बँकेनं केलेल्या इमेलमध्ये म्हटलं आहे.

तसेच आणखी पडताळणी करण्यासाठी आम्हाला अधिक माहिती लागेल,असंही त्या इमेलमध्ये म्हटलं आहे. कोकाटे यांनी या इमेलचा स्क्रीनशॉट ट्विट करत रणजितसिंह डिसले गुरुजींना खुलासा करण्याचं आव्हान दिलं होतं.

दरम्यान, रणजितसिंह डिसले गुरुजींनी ट्विटला रिप्लाय देत जागतिक बँकेकडून प्राप्त झालेले पत्र जोडले आहे. मला जागतिक बँकेकडून पत्र प्राप्त झाले आहे. पत्राची पडताळणी करण्यासाठी त्यांनी जागतिक बँकेची वेबसाईट देखील दिली आहे. तसेच पाठपुरावा करण्यासाठी वैभव कोकाटे यांचे आभार देखील मानले आहेत. पण, वैभव कोकाटे यांनी शेअर केलेला जागतिक बँकेचा इमेल आणि डिसले गुरुजींचे उत्तर यामुळे आता संभ्रम निर्माण झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC-मराठा समाजाला लढवणार निवडणुका जिंकणार? ओबीसी आंदोलनावरुन जरांगे संतप्त

Fact Check : साताऱ्यातील कास पठारावर फिरतेय सिंहांची टोळी? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Numerology Number 7 : पैसे मिळवण्याची कला, स्वतंत्र वृत्ती; ७,१६,२५ तारखेला जन्मलेले व्यक्ती कसे असतात? वाचा भाग्यांक

Pune Road Potholes: पुणे पालिकेची काढली लाज, रस्त्यावरील खड्ड्यांवरून लक्तरं वेशीला; नितीन गडकरी यांची राज्य सरकारला नोटीस

Nanded Politics : सेनापती भाजपात, 'सेना' कांग्रेसमध्ये; विधानसभेत नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना कुणाचं आव्हान? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT