सिडकोला घेराव घालणाऱ्या नेत्यांसह हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल  विकास मिरगणे
महाराष्ट्र

सिडकोला घेराव घालणाऱ्या नेत्यांसह हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल

स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्या, हि मागणी घेऊन सिडकोला घेराव घालणाऱ्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विकास मिरगणे

नवी मुंबई : परवानगी नसतानाही आंदोलनाची घोषणा आणि त्यासाठी जमाव करणे, यासह शासनाच्या नियमांचे उल्लंघन प्रकरणी नवी मुंबई विमानतळ नामकरण मागणीसाठी सिडकोला घेराव घालणाऱ्या सर्वपक्षीय समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आजी-माजी आमदार खासदार व हजारो आंदोलकांवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. New Mumbai International Airport Naming Agitation Cases Registered Against Protesters

या आंदोलनाला १८ ते २० हजार आंदोलक उपस्थित असल्याचा पोलिसांचा अंदाज असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. यात ४ माजी खासदार, २ माजी मंत्री, ७ आमदार, २ माजी आमदार, नवी मुंबईचे महापौर आणि उपमहापौर, पनवेलचे महापौर आणि उपमहापौर यांचा देखील समावेश आहे.

हे देखील पहा -

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा मुद्दा मोठ्या वादाचा विषय ठरला असून दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळाला द्यावे, यासाठी गुरुवारी सिडकोला घेराव घालण्याचे आंदोलन भूमिपुत्रांनी केले. यावेळी हजारोंच्या संख्येने आंदोलक नवी मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे विविध कायद्याचे उल्लंघन झाल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. असे, एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले.

कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, हुसेन दलवाई, रवीशेठ पाटील, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, कार्याध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. गणपत गायकवाड, आ. राजू पाटील, आ. किसन कथोरे, आ. रमेश पाटील, आ. मंदा म्हात्रे, माजी आ. सुभाष भोईर, माजी आ. संदीप नाईक, माजी आ. योगेश पाटील, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्यासह इतर नेते व जवळपास १८ ते २० हजार आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: कोल्हापूरच्या कुरुंदवाडमध्ये बँक घोटाळ्याविरोधात मेथे दाम्पत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT