Lek majhi Ladki Saam Tv
महाराष्ट्र

Lek majhi Ladki: लाडक्या बहिणींसाठी आणखी एक नवी योजना, सत्ताधारी आमदाराकडून मोठी घोषणा

Sadabhau Khot: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनी लाडक्या बहिणींसाठी ‘लेक माझी लाडकी’ योजनेची घोषणा केली. या योजनेचा लाभ सांगलीमधील महिलांना घेता येणार आहे.

Priya More

Summary-

  • सदाभाऊ खोत यांची ‘लेक माझी लाडकी’ योजना जाहीर.

  • महिलांना मोफत कॅन्सर लस उपलब्ध.

  • वाळवा तालुक्यातील महिलांना मिळणार लाभ.

  • रक्षाबंधनाच्या दिवशी योजनेची सुरुवात.

सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला राज्यभरातील महिलांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी १३ व्या हफ्त्याचे पैसे जमा देखील झाले. या योजनेबाबत नेहमी नवीन अपडेट येत असतात. अशातच सत्ताधारी आमादाराने लाडकींसाठी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींसाठी आमदार सदाभाऊ खोत यांनी रक्षाबंधननिमित्त 'लेक माझी लाडकी' ही अनोखी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना कॅन्सरची लस मोफत मिळणार आहे.

सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, 'सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडकी बहिणींना आधार दिला आहे. मी सुद्धा एक योजना सुरू करतो. माझ्या आमदार फंडातून सांगलीच्या वाळवा तालुक्यातील लाडक्या बहिणीसाठी मोफत कॅन्सरची लस देण्याचे जाहीर करतो. 'लेक माझी लाडकी' या योजनेअंतर्गत ही लस देण्यात येणार आहे.' आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीणध्ये ही घोषणा केली.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बावची या गावात शनिवारी रक्षाबंधनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी लेक माझी लाडकी योजनेची घोषणा केली. या योजनेमुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळेच लेक माझी लाडकी योजनेअंतर्गत त्यांना कॅन्सरची लस दिली जाणार आहे.

दरम्यान, सांगलीच्या रेठरे धरण येथील आमदार सदाभाऊ खोत यांच्या एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये रक्षाबंधन उत्साहात पार पडला. वाळवा तालुक्यातील रेठरे धरण येथे आमदार सदाभाऊ खोत यांच्या एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये बाल सवंगडी विद्यार्थी विद्यार्थिनी समवेत आमदार सदाभाऊ खोत यांच्या बहिणीने राखी बांधून औक्षण केले. यावेळी सैनिक स्कूलमधील विद्यार्थी यांना विद्यार्थिनींनीत्यांना राख्या बांधल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हायवेलगतच्या टार्जन डान्सबारवर मुंबईतील काशीमीरा पोलिसांची धाड

Toll Free: केंद्रानंतर राज्य सरकारनं दिली खुशखबर; आता 100 टक्के टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

Ulhasnagar News : धक्कादायक! उल्हासनगरच्या महिला आणि बाल सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुलींचं पलायन

Maharashtra Politics: फडणवीस सरकार अस्थिर करण्यामागे शिंदे? जरांगेंशी वाटाघाटीतून शिंदे दूर?

Karjat Muslim Township: मुंबईजवळ मुस्लिम टाऊनशिप वादात; मानवाधिकार आयोगाची सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT