shankarrao gadakh Saam TV
महाराष्ट्र

Nevasa: शंकरराव गडाखांना धमकी देणा-यांना अटक करा! नेवासा शहरात कडकडीत बंद

आज (बुधवार) सकाळपासून शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

गोविंद साळुंके

नगर : महाराष्ट्र राज्याचे मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (shankarrao gadakh) व त्यांचे पुत्र उदयन गडाख (udayan gadakh) यांना जीवे मारण्याची धमकी येत असल्याने गुन्हेगारांना अटक व्हावी या मागणीसाठी आज (बुधवार) नेवासा (nevasa) शहरासह तालुका बंदला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. (shankarrao gadakh latest marathi news)

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मंत्री शंकरराव गडाख व त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना जीवे मारण्याच्या कटा बाबतची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होत आहे.

याप्रकरणी गुन्हेगारांना त्वरित अटक होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नेवासा शहरासह तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज (बुधवार) सकाळपासून शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar: मराठी लोकांनी अन् गावखेड्यातल्या प्रत्येकाने...; महाराष्ट्र भाऊ प्रणित मोरेला अंकिता वालावलकरचा पाठिंबा

Myra Vaikul Dance: लाल साडी अन् कपाळी मळवट, नवरात्रीनिमित्त छोट्या मायराचा 'लल्लाटी भंडार...' गाण्यावर स्पेशल डान्स, VIDEO

Central Railway: नवी मुंबईकरांसाठी गुड न्यूज! सीवूड्स-उरण मार्गावर २० अतिरिक्त लोकल धावणार, मध्य रेल्वेचा मास्टरप्लॅन

Shocking News: दुर्दैवी! सासूच्या निधनाचा धक्का, अंत्यसंस्कारावेळी सुनेनंही सोडले प्राण, मन सुन्न करणारा VIDEO

Budget Scooters: १ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीतील टॉप स्कूटर्स कोणते? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT