CBI arrests Latur-based coaching institute director in NEET UG 2026 paper leak case during major investigation crackdown in Pune. saam tv
महाराष्ट्र

NEET पेपरफूटी प्रकरणात सर्वात मोठी कारवाई! RCC कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगांवकरांना CBI ने ठोकल्या बेड्या

NEET UG 2026 Paper Leak Case Investigation Update: NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने लातूर येथील रेणुकाई करिअर सेंटरच्या संचालकाला पुण्यातून अटक केली आहे.

Omkar Sonawane

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे: नीट युजी २०२६ (NEET UG 2026) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली असताना, केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. लातूर येथील प्रसिद्ध रेणुकाई करिअर सेंटर'चे (RCC) संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना सीबीआयने पुण्यातून अटक केली आहे. रविवारी (१७ मे २०२६) सायंकाळी ७:१५ वाजता ही कारवाई करण्यात आली.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर हे पेपर लीक करणाऱ्या एका संघटित टोळीचे सक्रिय सदस्य आहेत. तपासात असे समोर आले आहे की, २३ एप्रिल २०२६ रोजी, म्हणजेच परीक्षेच्या आधीच त्यांनी नीट युजी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरे मिळवली होती. १४ मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या झडतीत, त्यांच्या मोबाईलमध्ये या परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले होते. शिवराज मोटेगावकर यांनी ही प्रश्नपत्रिका अनेक व्यक्तींना आणि विद्यार्थ्यांना पुरवल्याचा संशय आहे. धक्कादायक बाब म्हणजे, परीक्षा झाल्यानंतर त्यांनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रश्नपत्रिका नष्ट केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच, ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांना हे पेपर दिले गेले, त्यांची नावे सांगण्यासही त्यांनी टाळाटाळ केली.

गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

मोटेगावकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (PC Act) आणि सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि परीक्षेतील गैरप्रकारांना खतपाणी घालणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

अटक केलेले आरोपी: शिवराज रघुनाथ मोटेगावकर (वय ४७ वर्षे)

व्यवसाय: संचालक, रेणुकाई करिअर सेंटर (RCC), लातूर

अटकेची वेळ आणि ठिकाण: १७ मे २०२६, पुणे येथील सीबीआय कार्यालय

जप्त केलेले साहित्य: आधार कार्ड आणि विविध बँकांचे डेबिट कार्ड

या अटकेमुळे लातूरसह संपूर्ण राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची मुळे किती खोलवर पसरली आहेत आणि यात आणखी कोणाचे हात गुंतलेले आहेत, याचा अधिक तपास सीबीआय करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा आगमन

PF Interest Rate: सरकार तुमच्या पीएफचं व्याज खात्यात कधी जमा करेल? डेडलाईन का चुकली? PFची नवीन अपडेट

Monsoon Update: महाराष्ट्रात मान्सूनचा कहर, पुढचे ४८ तास महत्वाचे; १९ राज्यांना अलर्ट

ऐन लग्नात नवऱ्याचा बाइकसाठी हट्ट; संतापलेल्या नवरीने ५ तासांत घेतला घटस्फोटाचा निर्णय

बीडमध्ये चाललंय काय? नदी पात्रात 100 कोटींचे अवैध वाळू उत्खनन? राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT