NEET Aspirant Ends Life Over Exam Result Fear; Mental Health Crisis Deepens in Bhandara Saam
महाराष्ट्र

NEET परीक्षेत नापास होण्याची भीती, तरूणानं उचललं टोकाचं पाऊल; कुटुंबावर दु:खाचा डोंगर | Bhandara

NEET Result Fear: भंडाऱ्यातील २१ वर्षीय नीट उमेदवाराने निकालाच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षणातील मानसिक तणावाने आणखी एक तरुण बळी घेतल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Bhagyashree Kamble

शुभम देशमुख, साम टीव्ही

NEET परीक्षेच्या निकालाच्या भीतीने एका २१ वर्षीय तरूणाने आयुष्य संपवलं आहे. ही ह्रदयद्रावक घटना भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील हसाराटोली गावात घडली आहे. युवक गेल्या काही महिन्यांपासून NEET परिक्षेची तयारी करत होता. या वर्षीचा निकाल शनिवारी लागणार असल्यानं तो प्रचंड तणावात होता. भीतीच्या भरात तरूणाने टोकाचं पाऊल उचललं. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

अमित रमेश बिसने असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो मागील काही महिन्यांपासून वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या NEET परीक्षेची तयारी करत होता. या वर्षीचा निकाल शनिवारी, १४ जून रोजी लागणार असल्याने तो प्रचंड तणावात होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

वडील रमेश बिसने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी अमितला NEET मध्ये ५९६ गुण मिळाले होते. यंदा अपेक्षित यश मिळणार नाही, या भीतीने तो मानसिकदृष्ट्या खचला होता. या भीतीच्या भरात त्याने गळफास लावून आपले आयुष्य संपवले असावे, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

घटनेच्यावेळी अमित घरी एकटाच होता. त्याने घरातील सिलिंग फॅनला दोरी लावून आत्महत्या केली. काही वेळाने कुटुंबीय घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी तुमसर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amdar Niwas Canteen : मोठी बातमी! आमदार निवासातील कॅन्टीनचा परवाना रद्द; अन्न व औषध प्रशासन विभागाकडून कारवाई

Dancing Car : आता काय म्हणावं? दोघांचा ताबा सुटला, दिवसाढवळ्या कारमध्येच जोडप्याचा रोमान्स, एकमेकांचे कपडे काढले अन्..., व्हिडिओ व्हायरल

गुंठाभर जमिनीचा ७/१२ सहज मिळणार, तुकडाबंदी कायदा रद्द करणार; सरकारची विधानसभेत घोषणा

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Ladki Bahin Yojana : नव्या लाडकींना लाभ मिळणार का? पोर्टल कधी सुरू होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT