NEET Exam Paper Leak  
महाराष्ट्र

NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन; पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णीला अटक

NEET Exam Paper Leak : सीबीआयने नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णी याला पुण्यातून अटक केली आहे.

Bharat Jadhav

देशाला हादवरून टाकणारा आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा नीट पेपर फुटीचं लातूर कनेक्शन समोर आले आहे. लातूरमधील प्राध्यापक पी.व्ही.कुलकर्णी हा या पेपर फुटीचा मास्टरमाईंड असल्याची माहिती हाती आली आहे. नीट परीक्षेच्या प्रक्रियेत कुलकर्णी यांचा एनटीएफतर्फे सहभाग असल्याची बाब उघडकीस आली असून पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी पी. व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक केली आहे.

नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयला मोठे यश मिळाले आहे. तपास यंत्रणेने या प्रकरणाचा सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णीला अटक केली आहे. यंत्रणेच्या मते कुलकर्णी हा पेपरफुटीचा मास्टरमाईंड आहे. पुण्यातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक असलेले पी.व्ही. कुलकर्णी हे एनटीएच्या वतीने परीक्षा प्रक्रियेत सहभागी होते आणि त्यांच्याकडे प्रश्नपत्रिका उपलब्ध होत्या, असं तपासात उघड झाले आहे.

पी.व्ही.कुलकर्णी हे लातूरमधील आहेत. त्यांनी पुण्यात अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका दिल्या होत्या, असा संशय तपास यंत्रणा आहे. कुलकर्णी यांनी पुण्यात विशेष कोचिंग क्लासेस घेतले होते. राज कोचिंग क्लासेसमधून विद्यार्थ्यांना प्रश्न आणि त्याचे उत्तर पत्रिका सुद्धा देण्यात आले असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे.

तपासाअंती एप्रिल २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात कुलकर्णीने दुसरी आरोपी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने काही विद्यार्थ्यांना एकत्र केले होते. दरम्यान सीबीआयने मनीषाला १४ मे २०२६ रोजी अटक केली होती. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, कुलकर्णी पुण्यात तिच्या घरी विद्यार्थ्यांसाठी विशेष क्लासेस घेत होता. या वर्गांमध्ये ती विद्यार्थ्यांना प्रश्न त्यांचे पर्याय आणि अचूक उत्तरे सांगत असायचा. कुलकर्णी यांनी दिलेले प्रश्नोत्तरे विद्यार्थी त्यांच्याकडील वह्यांमध्ये लिहून घेत असत. हेच प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या मूळ नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी जुळाली. चौकशीनंतर सीबीआयने पी. व्ही. कुलकर्णी यांना पुण्यातून अटक केली.

गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरातील अनेक ठिकाणी छापेही टाकले आहेत. या छाप्यादरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या कागदपत्रांची न्यायवैद्यक आणि तांत्रिक तपासणी सध्या सुरू आहे. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने १२ मे २०२६ रोजी या प्रकरणाची नोंद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाण्यात महासभेत गदारोळ, शिवसेना आणि भाजप आमने सामने

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा थरार, ३ मोठे ट्रक उलटले; २ जणांचा मृत्यू, वाहतूक ठप्प

भाजप युवा मोर्चा अध्यक्षाचं भीषण अपघातात निधन; पक्षातील दिग्गज नेते निवासस्थानी दाखल, राजकीय वर्तुळात शोककळा

डोक्यावर बर्फ अन् तोंडात साखर ठेवा; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात मोठं काही तर घडणार

'नीट'मुळे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, कधी होणार महाटीईटीची परीक्षा? नवी तारीख जाहीर

SCROLL FOR NEXT