नीट पेपरफुटी प्रकरणातील महाराष्ट्र कनेक्शन उघड
नाशिक, पुणे, अहिल्यानगर पेपर लीक रॅकेट
प्रश्नपत्रिका ३० लाखांना विकल्या
सीबीआयकडून या घोटाळ्याचा तपास सुरू
NEET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय. नाशिकनंतर अहिल्यानगर आणि पुण्यापर्यंत पेपरफुटीचे धागेदोरे पोहचले आहेत. नेमक्या किती जणांना अटक करण्यात आलीय? पेपर फोडण्याची मोडस ऑपरेंडी काय होती? आरोपींनी प्रश्नपत्रिका किती लाखांना विकली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
२२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या NEET पेपरफुटीचं रॅकेट महाराष्ट्रात सक्रीय असल्याचं उघड झालंय. नाशिकनंतर अहिल्यानगर आणि पुण्यातही याचे धागेदोरे समोर आले आहेत. पेपरफुटीच्या प्रकरणातील नाशिकमधला आरोपी शुभम खैरनारच्या चौकशीनंतर आता अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडेंला सीबीआयनं राहुरीतून ताब्यात घेतलयं...
- धनंजय लोखंडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरीमधील माहेगावचा रहिवासी
- कर्नाटकच्या मंगळुरूमधून B.A.M.Sचं शिक्षण
- पुण्याच्या वाघोली परिसरात वैद्यकीय प्रॅक्टिस
- मेडिकल प्रॅक्टिससाठी कन्सल्टिंगचं काम
तर दुसरीकडे या प्रकरणात पुण्यातल्या मनिषा वाघमारे या महिलेचं नाव समोर आलं असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तिच्या चौकशीतून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. कोण आहे ही मनिषा वाघमारे पाहूयात..
NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन
- बिबवेवाडीत मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर चालवायची
-संशयीत आरोपी मनीषा वाघमारे ही धनंजय लोखंडे आणि विद्यार्थ्यांमधील मुख्य दुवा होती..
- NEET परीक्षार्थींना शोधून त्यांना धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची
- मोबाईल आणि लॅपटॉप जप्त, संशयास्पद व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेजेस सापडले
राजस्थानच्या सीकरमध्ये मंगिलाल बिवल आणि दिनेश बिवल या दोन भावांना पोलिसांनी अटक केलीय...यातून नीटच्या पेपरेचे रेटच समोर आले आहेत. कुठे किती लाखांना या प्रश्नपत्रिका विकण्यात आल्या ते पाहूयात. नाशिकचा आरोपी खैरनारनं अहिल्यानगरमधील धनंजय लोखंडेकडून 10 लाख रुपयांत प्रश्नपत्रिका विकत घेतली. त्यानंतर नाशिकच्या खैरनारनं हीच प्रश्नपत्रिका 15 लाख रुपयांत हरियाणमधील आरोपीला विकली आणि मग हरियाणाच्या गुरुग्राममधील एका डॉक्टरनं 26 एप्रिलला राजस्थानाच्या बिवल भावांना 30 लाख रुपयात हीच प्रश्नपत्रिका विकल्याची माहिती सूत्रांनी दिलीय
हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, केरळ आणि आता महाराष्ट्र. या कनेक्शनमुळे NEET पेपरफुटीचं हे सिंडिकेट देशभरात पसरल्याचं उघड झालंय. मात्र लाखो मुलांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या पेपरमाफियांची पाळंमुळं सीबीआयनं खणून काढणं गरजेचं आहे. नाहीतर पेपरफुटीचं हे दुष्टचक्र असं सुरू राहणार यात शंका नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.