NEET Paper Scame Case Saam TV
महाराष्ट्र

NEET Paper Leak Case : NEET परीक्षा घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन? लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षक ताब्यात, पाहा VIDEO

NEET Paper Scame Case : नीट पेपरफुटीप्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात शनिवारी एटीएसच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

Satish Daud

NEET परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या या आरोपानंतर तपास यंत्रणा अधिक वेगाने कामाला लागल्या आहेत. दरम्यान, नीट पेपरफुटीप्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणात शनिवारी एटीएसच्या पथकाने लातूर जिल्ह्यातील दोन शिक्षकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

या दोन्ही शिक्षकांची सध्या कसून चौकशी केली जात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे तपासात नेमकं काय समोर येतं, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) या एजन्सीच्या वतीने घेण्यात आलेल्या सर्वात मोठ्या NEET परीक्षेत देशभरातील अनेक राज्यांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरात २३ लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नीट ची परीक्षा दिलेली आहे. मात्र निकालानंतर ग्रेस गुण आणि काही राज्यांमध्ये झालेल्या पेपरफुटीच्या गोंधळा नंतर 'नीट' परीक्षेमध्ये मोठी गडबड झाल्याचा संशय वाढला आहे. तर,परराज्यांत जाऊन परीक्षा देणे, तसेच वाढलेला निकाल या संदर्भाने अनेक चर्चा सुरू आहेत.

गुजरात, पंजाब, हरयाणा आणि बिहार या राज्यांत नीट पेपरफुटीच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनंतर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यात अनुषंगाने आता महाराष्ट्रातही 'एटीएस'च्या पथकाने तपास सुरू केला आहे. शनिवारी लातूर जिल्ह्यातून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

दरम्यान, नीट परीक्षेतील गैरप्रकार समोर आल्यानंतर सर्वबाजूने केंद्र सरकारची कोंडी झाली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास सीबीआय तसेच ईडीकडे सोपवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेऊन याचिका दाखल केली होती. याचिकेत तपास सीबीआय तसेच ईडीकडे सोपवण्याची मागणी करण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT