NEET Exam Latur Pattern  
महाराष्ट्र

NEET घोटाळ्याचा 'लातूर पॅटर्न'; पन्नास लाख द्या, 'नीट'ची प्रश्नपत्रिका घ्या !

NEET घोटाळ्यावरुन देशभरात रान उठलंय. बिहारचं कनेक्शन समोर आलं असताना थेट राज्यातील मराठवाड्यापर्यंत धोगेदोरे मिळत असल्यानं शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. कोचिंग फॅक्टरी बनलेल्या लातूरमध्ये कसा गोरखधंदा सुरु आहे. पाहूया त्यावरचा खास रिपोर्ट.

Girish Nikam

नीट घोटाळ्यावरुन बिहारचं कनेक्शन समोर आलं असताना थेट महाराष्ट्रापर्यंत धोगेदोरे मिळत असल्यानं शिक्षण क्षेत्राला हादरा बसला आहे. एकेकाळी दहावी-बारावी यशाचा लातूर पॅटर्न आता नीट घोटाळ्यातील कनेक्शनमुळं काळवंडला आहे. लातूर कोचिंग क्लासेसची फॅक्टरी झाली आहे. 'नीट' परीक्षेची तयारी करण्यासाठी मुले-मुली मोठ्या संख्येने येथे येतात. त्यामुळे 'मिनी कोटा' असाही लातूरचा उल्लेख होतो.

एटीएसच्या चौकशीत काय समोर आलंय ते पाहूया

लातूरचा शिक्षक जलिलखाँ पठाणच्या मोबाईलमध्ये 12 विद्यार्थ्यांचे एडमिट कार्ड आढळल्याची माहिती आहे. दोन्ही शिक्षक धाराशिवमार्ग दिल्लीला पैसे पाठवत जात होते. शिक्षकांच्या बँक खात्याचे व्यवहार संशयास्पद आहेत. एका शिक्षकाच्या कातपूर जि. प. शाळेतील कपाट सील केलं आहे. शाळेतील आवक-जावक रजिस्टरसह इतर साहित्यही जप्त केले.

दरम्यान नीट परीक्षेदरम्यान चालणाऱ्या गैरप्रकारांची माहिती काही क्लास चालकांनी 'साम'ला दिली. कसा गोरखधंदा चालतो ते पाहा. वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या 'नीट' परीक्षेची संभाव्य प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर प्रत्येकी तब्बल 40 ते 50 लाख रुपये द्या, अशी मागणी पालकांकडे होत आहे. पाल्याला 720 पैकी 650 गुण मिळतील, अशी खात्रीही पालकांना दिली जाते. त्यासाठी सक्षम, श्रीमंत पालकांची यादी तयार केली जाते. संभाव्य प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणारे रॅकेट लातूरमध्ये कार्यरत आहे.

नीट घोटाळ्याचं मराठवाड्याचं कनेक्शन महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी धक्कादायक आहे. NEET परीक्षेत सुधारणा सुचविण्यासाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सुधारणांकडे सगळ्यांचं लक्ष आहे. भावी डॉक्टर गुणवत्तेचे असतील अशी अपेक्षा करुया.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India-China : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका; भारताची चीनशी जवळीक, व्यापारात मोठी घडामोड घडणार?

Crime News: सून बाथरूममध्ये गेली, सासरा आधी एकटक पाहत बसला; नंतर आत शिरला अन्...

Police Officers Transfer : राज्यात बदल्यांचा धडाका सुरु! बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra Live News Update: काँग्रेस नेते अतुल लोंढे यांना धमकीचा कॉल

Skin Care Tips: मेकअपशिवाय ग्लोइंग स्कीन हवीये, मग 'या' ५ गोष्टी नक्की कराच

SCROLL FOR NEXT