Sartara Student End life Saam Tv
महाराष्ट्र

NEET Exam: नीटच्या परीक्षेत अपयश, १८ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य; साताऱ्यात हळहळ

Sartara Student End life: साताऱ्यात १८ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. नीट परीक्षेत नापास झाल्यामुळेत टोकाचे पाऊल उचलले.

Priya More
  • साताऱ्यातील कराड तालुक्यात विद्यार्थिनीची आत्महत्या

  • १८ वर्षीय नीट विद्यार्थिनीचा मृत्यू झाला

  • परीक्षेतील अपयशानंतर ती मानसिक तणावात असल्याची माहिती समोर

  • उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असून पोलिस तपास सुरू आहे.

संभाजी थोरात, सातारा

नीट परिक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून १८ वर्षीय विद्यार्थींनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यातील शेरे गावामध्ये ही घटना घडली. या विद्यार्थिनीने विषारी औषध पिऊन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोटच्या मुलीने टोकाचं पाऊल उचलून आत्महत्या केल्यामुळे आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आई-वडिलांनी अक्षरश: टाहो फोडला. या प्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याच्या कराड तालुक्यातील शेरे गावामध्ये समीक्षा दीपक पवार या मुलीने आत्महत्या केली. समीक्षाने नीटची परीक्षा दिली होती. पण परीक्षेत अपयश आल्याने ती नैराश्येत गेली होती. या नैराश्यातून समीक्षाने विषारी औषध प्राशन करून जीवन संपवलं. समीक्षाने विषारी औषध खाल्ल्यानंतर तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी गंभीर अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचारादरम्यान सोमवारी तिचा मृत्यू झाला.

समीक्षाने गेल्या वर्षी नीटची परीक्षा दिली होती. निकालात अपयश आल्याने ती मानसिक तणाव आणि नैराश्यात होती. त्याच अवस्थेत तिने २३ जुलै रोजी उंदरांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विषारी वड्या खाल्ल्या. मात्र, ही बाब तिने सुरुवातीला घरातील कोणालाही सांगितली नव्हती.

त्यानंतर दोन दिवसांनी विषाचा परिणाम शरीरावर होऊ लागल्याने तिला तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यावेळी तिने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने २६ जुलै रोजी तिला कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच सोमवारी तिचा मृत्यू झाला. स्पर्धा परीक्षांतील अपयशामुळे विद्यार्थ्यांवर वाढत असलेल्या मानसिक ताणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मसूर पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dark elbow and knee : कोपर-गुडघ्यांचा काळेपणा कमी करायचाय? स्किन केअरमध्ये या ६ गोष्टी नक्की करा

22k Gold Mangalsutra: लाडक्या बायकोसाठी 22 कॅरेट सोन्याचे मंगळसूत्र, लेटेस्ट 5 डिझाईन्स

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव उत्साहात संपन्न

Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी सकाळी प्यायला उपयुक्त 7 हेल्दी ड्रिंक्स; जाणून घ्या फायदे

Ola-Uber चालकांसह डिलिव्हरी बॉयंसाठी मोठी बातमी! मिळणार सामाजिक सुरक्षेचं कवच, असा होणार फायदा

SCROLL FOR NEXT