सोलापूर: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) पोलीस कोठडीत आहे. राज्यात अनेक ठिकाणी केतकीविरोधात गुन्हे (Crime) दाखल झाले आहेत. अशात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अभिनेत्री केतकी चितळेचं समर्थन केलं आहे. सदाभाऊ खोत यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रावादीचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोलापूरात आक्रमक झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थेट सदाभाऊ खोत यांच्या अंगावर धावून गेले आहेत. (NCP workers Aggresive Against Sadabhau Khot for supporting Ketki Chitale)
हे देखील पाहा -
सोलापूरात केतकी चितळेचं रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी समर्थन केलं. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे सदाभाऊ खोत यांच्यावरती धावून गेले. पवारांविरोधात जो बोलेल त्याला शोधा आणि तोडा अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने कांही दिवसांपूर्वी घेतलेली होती. त्यानुसार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सदाभाऊंवरती टाळ- मृदूंग घेऊन धावून आले. याबाबत सदाभाऊ खोत म्हणाले की, मी त्या कवितेचं समर्थन केलेलं नाही. पण सरकारविरोधात बोलणारं कुणाही असो मग ते राणा दाम्पत्य असो त्यांना पोलीस ठाण्यात घुसून हल्ला करतात. या राज्यात कायदा आणि सुव्यस्था आहे का? जेव्हा विरोधा पक्षातल्या नेत्यावर खालच्या स्तरावर टीका होते तेव्हा त्यांच्यावर का गुन्हा दाखल होत नाही? याचा अर्थ सरकार पुरस्कृत दंगा, आतंकवाद या राज्यात यांना वाढवायचा आहे का? असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.
केतकीच्या समर्थनार्थ सदाभाऊ नेमकं काय म्हणाले होते?
केतकी चितळे यांनी शरद पवार यांच्या वर वादग्रस्त पोस्ट केली होती. तिचे समर्थन करत सदाभाऊ म्हणाले की, केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावे लागेल, न्यायालयात तिने स्वतःची बाजू स्वतः मांडली असं सदाभाऊ म्हणाले. पुढे ते म्हणाले की, तुमची नैतिकता कुठे गेली होती? राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांनी देखील चंद्रकांत पाटील यांच्यावर वेगळा शब्द वापरत टीका केली त्यावेळी नैतिकता कुठे होती असा प्रश्न उपस्थित केला. या सोबतच अमोल मिटकरी यांनीदेखील ब्राम्हण समाजाला टार्गेट केले त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हते का..? असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.