Ajit Pawar Beed Sabha Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Beed Sabha: बीडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं...

Beed News: बीडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीलाच मिळणार, अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं...

साम टिव्ही ब्युरो

Ajit Pawar Beed Sabha: केंद्र आणि राज्यत एकाच विचाराचे सरकार आहे. आता आपल्या देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी चांगली मैत्री झाली आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार गटाची आज बीड येथे सभा पार पडली. याच सभेत बोलताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले की, ''पालकमंत्री पद देखील बीड जिल्ह्याचं आपल्याला मिळावं, यासाठी आम्ही काम करत आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आपल्याला राष्ट्रवादी, शिवसेना भाजप अशा लढायच्या आहेत. लोक काय बोलतात याकडे लक्ष द्यायचं नाही. सुरुवातीच्या काळात लोक टीका करतात. मात्र लोकांना कामातून उत्तर देणे ही आमची खासियत आहे.''

अजित पवार म्हणाले की, बीडकरांनी अनेक चढउतार बघितले आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो. ही संतांची भूमी असून मी संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. बीडच्या कष्टकरी लोकांच भलं करण्याच काम आम्हाला करायच आहे, हे माझ वचन आहे.

ते म्हणाले, प्रत्येकाच्या जीवनात चढउतार येत असतात. पण पुढे जायचं असतं. मी महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी सगळ्या जाती धर्माच्या समाजात आपण एक असल्याची भावना असली पाहिजे. परभणीत आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम झाला. आपल्याकडे देखील होणार आहे. बीड जिल्ह्याचा पीक विमा उतरवणार नाही, असं काही म्हणायचे. त्यावर आपण उपाय काढला. आता १ रुपयात पीक विमा उतरवण्याचं काम केलं राज्य आणि केंद्र सरकार पैसे भरत आहेत.'' (Latest Marathi News)

कांदा प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, कांद्याच्या प्रश्नी छगन भुजबळ यांच्यासह अनेकाणी फोन केले. यातून काहीतरी मार्ग काढा. यातच विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही धनंजय मुंडेंना दिल्लीत पाठवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी गोयल यांना फोन करुन चर्चा केली. यानंतर २४१० चा दर मिळाला. संकट येतात, पण मार्ग काढायचा असतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: फटाके वाजवायला गेला, पोरांनी घाबरवले, तोंडावरच आपटला, व्हिडीओ पाहून तुम्हीही हसाल

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू

Navi Mumbai Accident : दिवाळीत 'ड्रंक अँड ड्राइव्ह, नवी मुंबईत मद्यपी चालकाने ३ जणांना उडवले, व्हिडीओ व्हायरल

Horoscope Today Marathi : नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी कुणावर होणार धन अन् सुखाचा वर्षाव? वाचा आजचे राशीभविष्य

Surya nakshatra gochar: सूर्याच्या नक्षत्र बदलाने 'या' राशींचं नशीब चमकणार; 'या' राशींच्या हाती येणार बक्कळ पैसा

SCROLL FOR NEXT