Chhagan Bhujbal On Vidhansabha Seat Sharing SaamTv
महाराष्ट्र

NCP Vardhapandin: जेवढ्या जागा शिंदेना तेवढ्या जागा आम्हाला हव्या; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुजबळांची मागणी

Bharat Jadhav

विधानसभेच्या वेळी जागा वाटप करताना जास्त घालवू नये. तसेच शिंदे गटाला जेवढ्या जागा दिल्या जातील, तितक्याच जागा आम्हाला द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केलीय. अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ वा वर्धापनदिन साजरा केला जातोय. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात बोलतांना छगन भुजबळ यांनी विधानसभेतील जागा वाटपावरून सुतोवाच केले.

लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागलेत. लोकसभा होत नाही तोच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या तयारीकडे मोर्चा वळवलाय. युती आणि आघाडीमधील मित्रपक्ष जागावाटपांवर आपली भूमिका स्पष्ट करत आहे. लोकसभेच्या वेळी महायुतीत जागावाटपावरुन मोठा वाद झाला होता. त्यामुळे अनेक मतदारसंघात उमेदवारांची घोषणा उशिरा झाली परिणामी उमेदवारांना प्रचारासाठी कमी वेळ मिळाला होता. तसा गोंधळ होऊ नये, यासाठी विधानसभेच्या दरम्यान जागा वाटपामध्ये वेळ घालवू नये,अशी सूचनाही छगन भुजबळ यांनी भाजपला दिलीय.

संविधान बदलाच्या प्रचाराने एनडीएला मोठा फटका बसला.महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशातही या प्रचाराचा फटका बसला.युपीमध्ये भाजपच्या जागा कमी होतील असं वाटत नव्हतं परंतु संविधान बदलाच्या प्रचारामुळे कमी जागा निवडून आल्यात. 'इंडिया' आघाडी या प्रचारातून जनतेची दिशाभूल करण्यात यशस्वी झाले. यामुळे लोकसभेला ठेच लागली हे नाकारता येणार नाही. यामुळे पुढे काळजी घ्यावी लागेल.

आपण फुले-शाहू- आंबेडकर या महान नेत्यांची नावे घेतो त्यामुळे आपल्याला ते कृतीतून करुन दाखवावे लागेल. सर्व जाती धर्मांतील लोकांचे मते आणि त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल,असे भुजबळ म्हणालेत.

लोकसभेसारखं यावेळी जागावाटपाची चर्चा शेवटपर्यंत करू नये. जागावाटपाचा निर्णय लवकरात लवकर लावला पाहिजे. तातडीने जागा वाटून घ्या,भले उमेदवार नंतर ठरवा.राज्यात भाजप मोठा भाऊ असा फॉर्म्युला ठेवाल तर त्यांनी सांगितला आमदारकीचा उमेदवार आम्हाला मान्य राहील. पण विधानसभेत जागा देणं आम्ही खपवून घेणार नाहीत.

शिंदे गटाला जेवढ्या जागा असतील तितक्या जागा आम्हालाही हव्यात. तेव्हा असं म्हणून नका की, शिंदे गटाचे खासदार जास्त आहेत,म्हणून त्यांना जास्त जागा दिली जाईल,असा नियम लावाल तर ते चालणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

SCROLL FOR NEXT