विजय पाटील
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांना वारंट काढले होते. आमदार जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली आहे. (jayant Patil News)
जिल्हा परिषद निवडणूकीवेळी जयंत पाटील यांनी शिगाव येथे रस्त्यावरच ठिय्या मारला होता. त्यानंतर मुंबई पोलिस अधिनियमानुसार जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिसात आमदार जयंत पाटील यांच्यासह स्वरुपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील , शरद गायकवाड , मोहन गायकवाड , राजेंद्र भासर , विलासराव शिंदे , जितेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी इस्लामपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने आ.जयंत पाटील यांना वारंट काढले होते. आज दुपारच्या सुमारास आ.जयंत पाटील इस्लामपूर न्यायालयात हजर राहिले होते. जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे.
राज्यात गेल्या काही महिन्यापूर्वी महानगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुका (election) जाहीर झाल्या आहेत. पण आरक्षणच्या मुद्यावरुन स्थगिती मिळाली आहे, त्यामुळे सध्या नगरपालिकेत गेल्या सहा महिन्यापासून प्रशासक आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मध्येही प्रशासक आहे, पण शहरातील बॅनरमुळे सध्या इस्लामपूर नगरपालिका चांगलीच चर्चेत आली आहे.‘साठ महिन्यात नाही झाले ते अवघ्या सहा महिन्यात केलं’ अशा आशयाचे बॅनर असून त्यावर जयंत पाटील यांचे फोटो आहेत. हे बॅनर इस्लामपुरात झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.