BMC Elections 2022: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता मुंबई महापालिका (BMC) निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सोडत काढण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
BMC Election news
BMC Election news saam tv

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता मुंबई महापालिका (BMC) निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) सोडत काढण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या शुक्रवारी २९ जुलै २०२२ रोजी ओबीसी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. (BMC Election News Update In Marathi )

BMC Election news
पत्नीला लुगडं घेण्याची ऐपत नाही, शहाजीबापू पाटील यांना राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे साडीची भेट

राज्य निवडणूक आयोगानुसार, आता एससी व एसटी प्रवर्गाचे आरक्षण वगळता यापूर्वी जाहीर करण्यात आलेले सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गाचे आरक्षण रद्द करून नव्याने ओबीसी व महिला सर्वसाधारण वर्गांसाठी आरक्षण काढले जाणार आहे.

तसेच मुंबई महापालिकेचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मंगळवारी, २६ जुलै रोजी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्याकरता आरक्षित जागा निश्चित करण्याकरता सोडत काढण्यासाठी जाहीर नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. तर शुक्रवारी, २९ जुलै २०२२ रोजी या प्रवर्गासाठी जागा आरक्षित करण्याकरता सोडत काढली जाईल.

BMC Election news
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी नव्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

दरम्यान, ३० जुलै रोजी सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध केले जाईल. ३० जुलै ते २ ऑगस्ट २०२२ या कालावधीत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत असेल. तसेच ५ ऑगस्ट २०२२ रोजी आरक्षणाबाबत प्राप्त झालेल्या हरकती व सूचना यांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com