Samarjeet Singh Ghatge Joining BJP News Saam Tv
महाराष्ट्र

Political News : शरद पवार गटाला मोठा धक्का! बड्या नेत्याने धरली भाजपची वाट; पक्षप्रवेशाचा मुर्हूतही ठरला

Samarjeet Singh Ghatge Joining BJP News : कोल्हापूरच्या राजकारणात मोठी हालचाल होत असून समरजीत सिंह घाटगे ८ एप्रिल रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या निर्णयामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • समरजीत सिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार

  • ८ एप्रिल रोजी मुंबईत प्रवेश होणार

  • शरद पवार गटाला मोठा धक्का

  • कोल्हापूरच्या राजकारणात बदल होण्याची शक्यता

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील समरजीत सिंह घाटगे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या पक्ष प्रवेशाने कोल्हापूरच्या राजकारणात मोठा भूकंप येणार असून शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

मागील विधानसभा निवडणुकीवेळी समरजीत सिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. अनेक दिवसांपासून समरजीत घाटगे यांच्या भाजप घरवापसीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत समरजीत घाटगे हे येत्या ८ एप्रिल रोजी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

भापचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत घाटगे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचं समोर येत आहे. घाटगे यांनी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र आता हसन मुश्रीफफ आणि समरजीत घाटगे दोघेही एकत्र आल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वीच घाटगे यांनी भाजप कार्यालयात चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याचंही पाहायला मिळालं. तसेच त्यांनी भाजपच्या विविध बैठकांना उपस्थिती देखील लावली होती. दरम्यान त्यांच्या या पक्ष प्रवेशाने कोल्हापुरातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून शरद पवार गटातील एका बड्या नेत्याने साथ सोडल्याने हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT