आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जास्ती जास्त जागांवर लढेल असा दावा आणि विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी आत्ताच संख्या सांगणार नाही अन्यथा त्यावर चर्चा सुरु हाेईल असेही स्पष्ट केले.
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे जयंत पाटील हे एका सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. ते म्हणाले सगळे होते त्यावेळी चार खासदार निवडुन आले होते. आता जवळपास सगळे कमी झाले. त्यामुळे चार-पाच होतील असं वाटलं होतं पण मतदान चाराचे 8 झालेत असा अप्रत्यक्ष टाेला जयंत पाटलांनी अजित पवार गटाला लगावला.
जयंत पाटील यांनी हातकणंगले मतदारसंघात थोडं दुर्लक्ष झाल्याचे म्हटले. त्यामुळे फटका बसला पण या मतदारसंघात धनशक्तीचा विजय झाला. जनशक्ती ही सत्यजित पाटलांच्या सोबतच आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी विधानसभा निवडणुकीत सांगलीत तीन जागा लढवणार आहाेत मात्र आणखी एक दुसरी जागा मिळवायची आहे असे जयंत पाटलांनी स्पष्ट केले. मात्र सांगली जिल्ह्यातील कोणत्या विधानसभा मतदारसंघावर दावा सांगणार हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.
सांगली लोकसभेच्या जागा वाटपामध्ये आपला काहीच संबंध नव्हता,मात्र आपल्या बद्दल गैरसमज पसरला असे स्पष्टीकरण जयंत पाटलांनी देत कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसने घेतल्याने शिवसेनेने सांगलीची काँग्रेसची जागा घेतल्याचे त्यांनी आज जाहीर केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.