उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे राज्यसभेत रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीच्या या जागेवरून चांगलीच स्पर्धा सुरू असून यासाठी पक्षातील आणि काही बाहेरचे नेते देखील इच्छुक आहे. भाजपच्या नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा देखोल राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत राज्यसभा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले जात होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव देखील आघाडीवर आहे. या सगळ्याची चर्चा सुरू असताना प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी थेट भाष्य केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत अखेर थेट भाष्य केले. माजी खासदार नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी दिली जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र सुनील तटकरे यांनी या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला आहे. नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आता पूर्णपणे संपलेला आहे, असे स्पष्ट करत त्यांनी राणा यांना उमेदवारी देण्याचा कोणताही विचार नसल्याचे जाहीर केले. सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेतील कार्यकाळानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती, आता यावरच पक्षाने अधिकृत माहिती दिली आहे.
तर मंत्री छगन भुजबळ यांचे जवळपास निश्चित झाले असले तरी भुजबळ यांनी समीर भुजबळ यांना मंत्रीपद देण्याची अट घातली आहे. यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांत्रिमंडळात कुठलाही बदल करायचा असेल तर हायकमांडला याबाबत विचारावे लागेल असे सांगितले आहे. त्यामुळे सोमवार पर्यंत कोणाचे नाव समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.