Chandrakant Patil, Dr. Babasaheb Ambedkar, Satara, Pandharpur, Solapur, NCP, RPI, Buldhana saam tv
महाराष्ट्र

Chandrakant Patil Controversy : 'चंद्रकांत पाटलाला उभा जाळू' मंत्री पाटील यांच्या निषेर्धात आंदाेलन

आज राज्यभरात विविध संघटनांकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेध नाेंदविला जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

Chandrakant Patil Controversy : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. त्यांचा निषेध करावा कमी तेवढा थाेडाच आहे. खरंतर चंद्रकांत पाटील यांनी डाॅ. आंबेकडकर यांच्यापुढे नतमस्तक हाेत माफी मागावी अशी भावना व्यक्त करीत आज (शनिवार) राज्यभरात मंत्री पाटील यांचा आरपीआय, राष्ट्रवादी काॅंग्रेससह (ncp) आदी संघटना निषेध नाेंदवित आहेत.

साेलापूरात पाटलांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

साेलापूरात (solapur) भाजप कार्यालयासमोर युवा भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने पाटील यांचा निषेध नाेंदविण्यात आला. भाजप नेत्यांकडून यापुढे महापुरुषांची विटंबना करण्यात आली तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा महेश डोलारे (अध्यक्ष, युवा भीम सेना) यांनी दिली.

भीम आर्मीचे आंदाेलन

दरम्यान साेलापूरात भीम आर्मीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. सोलापुरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पाटील यांचा पुतळा जाळत निषेध नाेंदविला. चंद्रकांत पाटलांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल अपशब्द उदगारल्याने सोलापुरातील आंबेडकरी जनतेच्या भावना झाल्या तीव्र झाल्या आहेत.

उद्या देवेंद्र फडणवीसांना सोलापुरात पाऊल ठेवून देणार नाही तसेच पुन्हा काही बरळले तर चंद्रकांत पाटलांना जिवंत जाळू असे अजय मैंदर्गीकर (शहराध्यक्ष, भीम आर्मी) यांनी नमूद केले.

पंढरपुरात निषेध

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुष विषयी केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. आज पंढरपुरात ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन केले. येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे नेते श्रीकांत शिंदे व संदीप मांडवे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

साताऱ्यात आरपीआयचा रास्ता रोको

भाजप नेते चंद्रकांत पाटलांच्या विधानावर साताऱ्यात (satara) आठवले आर पी आय गट आक्रमक झाला आहे. एका कार्यक्रमात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्या नंतर साता-यातील आंबेडकर पुतळ्या जवळ आरपीआयच्या कार्यकर्तेनी एकत्र येऊन रास्ता रोको केला. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी माफी मागितली नाही तर सातारा बंदची हाक देण्यात येईल असेही आप्पा तुपे (रिपब्लिकन पक्ष आठवले गट) यांनी नमूद केले.

बुलढाण्यात राष्ट्रवादीचे आंदाेलन

बुलढाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. स्थानिक जयस्तंभ चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बुलढाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आंसंख्य पदाधिकारी उपास्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT