Pandharpur Corridor : माेर्चानंतर पंढरपूर विकास आराखडा बैठकीत पालकमंत्री विखे पाटलांनी दिले 'हे' आश्वासन

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री घेतली नागरिकांची बैठक.
Pandharpur Corridor, radhakrishna vikhe patil
Pandharpur Corridor, radhakrishna vikhe patilsaam tv
Published On

Pandharpur Corridor : पंढरपूर शहरातील नागरिकांनी सु़धारीत तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत पंधरा दिवसात सादर करण्याच्या सूचना कराव्यात. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांनी दिले आहे.

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत गुरुवारी रात्री पंढरपुरातील व्यापारी आणि नागरिकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिलासादायक माहिती दिली.

Pandharpur Corridor, radhakrishna vikhe patil
Pandharpur Corridor : एकच जिद्द कॉरिडॉर रद्द; पंढरपूरात महामाेर्चा

पंढरपूर विकास आराखडा आणि कॉरिडॉर हा वारक-यांना केंद्रबिंदू मानून बनविण्यात आला असला तरी स्थानिक नागरिकांना उध्वस्त करून राबविला जाणार नसल्याची ग्वाही विखे पाटील यांनी यावेळी दिली. दरम्यान नागरिकांनी आपला आराखडा येत्या १५ दिवसात देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Pandharpur Corridor, radhakrishna vikhe patil
Veer Sawarkar Row : भाजप खासदार म्हणतात, 'घराेघरी जाऊन सांगा राहुल गांधींचा डीएनए तपासला पाहिजे' (पाहा व्हिडीओ)

हा कॉरिडॉर अथवा शहरातील विकास आराखडा हा भविष्याचा विचार करून केला जाणार असल्याचे सांगताना यात विस्थापित हाेणा-यांना चांगले पॅकेज देण्याचाही प्रयत्न असल्याचे विखे पाटलांनी नमूद केले.

Pandharpur Corridor, radhakrishna vikhe patil
Shirdi Sai Baba : शिर्डीतील साईंच्या झाेळीत ३९८ कोटींचे दान

वाराणसी व उज्जैन या ठिकाणी झालेल्या कॉरिडॉरला तेथील व्यापारी अथवा नागरिकांनी (citizens) विरोध केल्याचे समोर आले नसून त्याच धर्तीवर येथील व्यापारी आणि नागरिकांना चांगला मोबदला देत त्यांना विश्वासात घेऊन आराखडा राबविण्याचा शासनाचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्यावेळी तो टप्पा येईल त्यावेळी विस्थापित होणारे व्यापारी आणि नागरिकांचे एक बोर्ड बनवून पुढील चर्चा होईल असे संकेत विखे पाटलांनी दिले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com