Veer Sawarkar Row : भाजप खासदार म्हणतात, 'घराेघरी जाऊन सांगा राहुल गांधींचा डीएनए तपासला पाहिजे' (पाहा व्हिडीओ)

राहुल गांधी यांना दोन वर्ष काय तर वीस दिवस कोठडीत ठेवलं तर त्यांची पिवळी झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका खासदार बोंडे यांनी केली.
anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeray
anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeraySaam TV
Published On

- अमर घटारे

Veer Sawarkar Row : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संपूर्ण कुटुंबाने देशासाठी माेठे याेगदान दिले. त्यांच्या बाबतीत जर राहुल गांधी काहीही बोलत असतील तर त्यांना माफ करायचं का ? असा सवाल उपस्थितांना करुन त्यांचा डीएनए तपासणे करणं आवश्यक आहे असे मत भाजप खासदार अनिल बोंडे यांनी एका जाहीर कार्यक्रमात व्यक्त केले.

खासदार बाेंडे म्हणाले यापुर्वी राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत एक व्यक्तव्य केले हाेते. तेव्हा जर राहुल गांधी मला भेटले तर मी त्यांना तिथल्या तिथे जोड्याने मारेल असे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी खडसावले हाेते. आता उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य राहुल गांधी सोबत हातात हात घालून यात्रेत फिरत आहे.

anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeray
Mumbai Local Mega Block : रविवारी रेल्वेचा मेगा ब्लाॅक; प्रवाशांसाठी बेस्ट सज्ज, शनिवारपासून जादा बसेस

आता पुन्हा राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केले. त्या वक्तव्याचा निषेध नाेंदविताे. राहुल गांधी यांना दोन वर्ष काय तर वीस दिवस कोठडीत ठेवलं तर त्यांची पिवळी झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका खासदार बोंडे यांनी अमरावती (amravati) जिल्ह्यातील वरुड तालुक्यामध्ये एका कार्यक्रमात केली. (Maharashtra News)

anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeray
Swabhimani Shetkari Sanghatana : कराडात पाेलिस संरक्षणात ऊस वाहतूक सुरु; सांगलीत दीडशे वाहने राेखली

खासदार अनिल बोंडे म्हणाले भारतमातेबद्दल प्रेम असेल तर तो स्वातंत्र मिळवणाऱ्यांच्या बाबतीत असे बोलू शकत नाही. त्यांचा डीएनए तपासण्याची गरज आहे. कुठेतरी गडबड आहे असेही बाेंडेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

anil bonde, swatantra veer savarkar , uddhav thackeray , rahul gandhi, aditya thackeray
Trains Cancelled : तपोवन एक्सप्रेससह मुंबईला जाणा-या १२ ट्रेन रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com