Chandrakant Patil : '..तर मी दिलगिरी व्यक्त करतो'; महापुरुषांवरील विधानावर चौफेर टीकेनंतर चंद्रकांत पाटील बॅकफूटवर

मी मोठ्या मनाचा आहे, दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर माफी मागितली आहे.
Chandrakant Patil
Chandrakant Patil Saam Tv

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

Chandrakant Patil Latest News : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे. भीक या शब्दावरून भावना दुखावले असतील तर मी मोठ्या मनाचा आहे, दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

Chandrakant Patil
Sanjay Raut : कर्नाटकचे मुख्यमंत्री भूमिका मांडताहेत; CM शिंदेंच्या तोंडाला कुलूप का? संजय राऊतांचा सवाल

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण संतपीठच्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलताना, भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरूषांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. 'या देशात शाळा कुणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केल्या, बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केल्या. महात्मा फुलेंनी केल्या. या शाळा सुरू करताना गर्व्हनमेंटने त्यांना अनुदान दिलं नाही, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा सुरू करतोय पैसे द्या,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांच्या या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. राज्यातील अनेक जिल्ह्यांत त्यांच्याविरोधात आंदोलन केली जात होती. औरंगाबादेतही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आज सकाळी देखील पाटील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केल्याने या प्रकरणावर काहीसा पडदा पडण्याची शक्यता आहे. 

Chandrakant Patil
Chandrakant Patil Controversy : 'चंद्रकांत पाटलाला उभा जाळू' मंत्री पाटील यांच्या निषेर्धात आंदाेलन

चंद्रकांत पाटील दिलगिरी व्यक्त करताना काय म्हणाले?

महापुरूषांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर दिलगिरी व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'भीक म्हणजे काय तर आपण महापुरुषांच्या जयंतीसाठी किंवा वेगवेगळ्या उत्साहाच्या वेळी वर्गणी जमा करतो. त्यामुळे या भीक शब्दाने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे'.

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मी एवढ्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या रक्ता-रक्तात आंबेडकर, महात्मा फुले हे आहेत. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्याबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करण्यास माझी काहीही हरकत नाही, असं पाटील म्हणाले. 

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com