Sunil Tatkare Chhagan Bhujbal Saam TV Marathi News
महाराष्ट्र

राष्ट्रवादीत मोठा राडा? सुनील तटकरेंनी मनातलं सगळं बाहेर काढलं; भुजबळांनाही ऐकवलं, नेमकं काय घडलं?

Chhagan Bhujbal and Tatkare verbal clash news : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी पक्षातील नाराजी उघडपणे व्यक्त केली. छगन भुजबळांसोबत शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली.

Ganesh Kavade, Namdeo Kumbhar

Sunil Tatkare Chhagan Bhujbal latest statement in NCP meeting : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत प्रचंड हाय-व्हॉलटेज ड्रामा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मनात गेल्या अनेक दिवसांपासून साचलेला सगळा राग अखेर या बैठकीत बाहेर आला. तटकरे आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र भुजबळांना थांबवत तटकरेंनी त्यांनाही सुनवले. मी आणि पटेल आम्ही दोघेच टीकेची धनी का? आम्हाला विलन ठरवले जातेय? अशी नाराजी तटकरेंनी सुनेत्रा पवार यांच्यासमोरच बोलून दाखवली.

देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत भुजबळ आणि तटकरे यांच्यामध्ये शा‍ब्दिक चकमक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या अंतर्गत वादाने राष्ट्रवादीच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. नक्की बैठकीत कोणत्या मुद्द्यावरून ठिणगी पडली आणि तटकरे का भडकले? याची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत भुजबळ- तटकरे यांच्यात जुंपली

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवारांच्या हातात देणे, पक्ष एकसंध ठेवणे यात आपण आणि प्रफुल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्यानंतर उद्भवलेल्या स्थितीमधे आमच्या दोघांवर टीका सुरू असताना एक ही आमदार अथवा नेता आमच्या बचावात पुढे आला नाही, अशी नाराजी बोलून दाखवण्यात आली.

आम्हीच टीकेचे धनी का?

विलीनीकरण चर्चा सुरू झाली, त्यावेळी देखील टीकेच्या तोंडी आम्ही दोघे गेलो. मात्र इतर कुणीही आमची बाजू मांडली नाही अथवा बचावासाठी पुढे आले नाही. केवळ प्रफुल पटेल आणि तटकरे यांनीच टीकेचे धनी का व्हायचे? वरिष्ठ नेतृत्व याबाबत काही भूमिका घेणार आहे की नाही? सुनील तटकरे यांनी असा सवाल या बैठकीत उपस्थित केला.

तटकरे-भुजबळ यांच्यात शा‍ब्दिक चकमक -

सुनील तटकरे यांच्याकडून सवाल उपस्थित केल्यानंतर भुजबळ यांच्याकडून तटकरेना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तटकरे यांनी भुजबळांना उत्तर देताना आपण यावर बोलणार आणि याबाबत स्पष्टता यायला हवी अशी भूमिका मांडली. तटकरे यांचं भाषण सुरू होण्यापूर्वीच पार्थ पवार यांनी बैठकीतून काढता पाय घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत सुनील तटकरे यांनी भूमिका मांडल्यानंतर एका ही आमदाराने याबाबत भूमिका मांडली नाही, अशी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिमची गरज कशाला? पोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 मिनिटांत करा 5 योगा

Maharashtra News Live Update : खेड तालुक्यात जनगणनेला दांडी; पती-पत्नींसह ९ शिक्षकांवर कारवाईची तयारी

Prajakt Tanpure: अखेर प्राजक्त तनपुरे यांचं ठरलं! भाजपमध्ये करणार प्रवेश; फेसबुक प्रोफाईलही बदलला

Mahanagar Gas Limited : पेट्रोल-डिझेलनंतर गॅसचं संकट! महानगरचा PNG-CNG वर मोठा निर्णय, सर्व सबसिडी आणि योजना बंद

Deool Band 2 Collection : स्वामी नामाचा गजर! 'देऊळ बंद २'नं 'राजा शिवाजी' ला पछाडलं; प्रवीण तरडेंचा बॉक्स ऑफिसवर जलवा, कमाई वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT