High-voltage political drama unfolds in Pune as NCP faces internal conflict over Vikram Kakade’s candidature and Sunil Tingre’s rebellion. saam tv
महाराष्ट्र

भाजपच्या काकडेंना राष्ट्रवादीची उमेदवारी, राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंची बंडखोरी

Pune Politics Heats Up: पुण्यात विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत चांगलचं नाराजीनाट्य रंगलयं...भाजपच्या विक्रम काकडेंना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिल्यानं माजी आमदार सुनील टिंगरेंनी बंडखोरी केल्यानं हाय व्होल्टेज ड्रामा कसा रंगलाय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

पुणे विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीवरून दादांच्या राष्ट्रवादीत चांगलाच हाय होल्टेज ड्रामा रंगलाय. विधानपरिषद जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून सुनील टिंगरेंना संधी दिली जाईल, अशी शक्यता होती... मात्र रात्रीतून चक्र फिरली आणि ऐनवेळी विधान परिषदेसाठी भाजप नेते संजय काक़डेंचा मुलगा विक्रम काकडेंनी बाजी मारली...उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस नाट्यमय घडामोडींचा ठरला...जिजाऊ बंगल्यावर तब्बल 4 तास पक्षातील वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक झाली... याच बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत संजय काकडंनी भाजपला सोडचिठ्ठी देत आपला मुलगा विक्रमसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.आणि सुरू झालं नाराजी नाट्य.. इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार सुनील टिंगरेंनी थेट बैठकीतून काढता पाय घेतला. आणि त्यांच्या नाराजीची जोरदार चर्चा रंगली. मात्र ते नाराज नसल्याचा दावा संजय काकडेंनी केला.

मात्र अर्ज भरण्यासाठी अखेरचा तास शिल्लक असताना विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे हे दोघेही अर्ज घेण्यासाठी पक्ष कार्यालयात गेले. त्यामुळे कुणाला एबी फॉर्म मिळणार याची उत्सुकता आणखीनच ताणली गेली. मात्र अखेर विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीकडून अधिकृत अर्ज दाखल केल्याची घोषणा राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आणि काकडेंनी टिंगरेंना झटका दिला.

तर दुसरीकडे टिंगरेंनी डमी अर्ज दाखल केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मात्र अर्ज दाखल केल्यानंतर बाहेर आलेल्या टिंगरेंनी आपण अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सांगून पिक्चर अभी बाकी है असा थेट संदेश काकडेंना दिला. त्यानंतर टिंगरेंच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे चर्चेतून मार्ग काढणार असल्याचं जय पवारांनी सांगितलं.

विक्रम काकडे हे पार्थ पवारांचे निकटवर्तीय मानले जातात.. त्यामुळे ऐनवेळी भाजपातून आलेल्या विक्रम काकडेंना उमेदवारी जाहीर होताच... पक्षात पार्थ पवारांचं वजन वाढल्याची चर्चा रंगलीय....मात्र सुनील टिंगरे मैदानात उतरल्यामुळे राष्ट्रवादीतला सस्पेन्स माघारीच्या दिवसापर्यंत वाढलाय. त्यामुळे टिंगरे माघार घेणार की बंडखोरी करून काकडे आणि पक्षश्रेष्ठींना आव्हान देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT