राष्ट्रवादीचे मिशन मिनी विधानसभा इलेक्शन SaamTv
महाराष्ट्र

Breaking : राष्ट्रवादीचे मिशन मिनी विधानसभा इलेक्शन!

राज्यात २०२२ साली होणार्‍या तब्बल १८ महापालिका, २७ जिल्हा परिषद आणि २०० च्या घरात नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्रात आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पक्षांसह छोट्या-मोठ्या पक्षांनी देखील या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कंबर कसायला सुरुवात केली आहे. भाजप, काँग्रेस, मनसे तसेच शिवसेना या प्रमुख पक्षांचे राज्यभरात दौरे वाढल्याचे दिसून येत आहे.

हे देखील पहा -

याच अनुषंगाने २०२२ साली होऊ घातलेल्या तब्बल १८ महापालिका, २७ जिल्हा परिषद आणि २०० नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी राष्ट्रवादीने जोमाने सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकाऱ्यांची एक महत्वपूर्ण आढावा बैठक बोलावली होती. आजच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.

पालकमंत्र्यांनी आणि संपर्क मंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यात दौरे केले पाहिजेत पण, मेळावे घेणे मात्र टाळले पाहिजे अशी सूचना पवार यांनी केली आहे. ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवावी आणि गरज असेल तिथे मित्र पक्षांबरोबर आघाडी करण्यास पवारांनी सांगितले आहे.

भाजपला स्थानिक स्वराज संस्थांमध्ये सत्तेपासून दूर ठेवण्याठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याबाबत चर्चा देखील या बैठकीत झाली आहे. प्रत्येक ठिकाणच्या राजकीय परिस्थितीनुसार आघाडी की स्वबळ याचा निर्णय घेतला जाणार आहे. शरद पवारांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत निवडणणुकांच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, राज्यमंत्री आणि काही प्रमुख नेते उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Accident : भीषण अपघात; अनियंत्रण कार ४० फुटावरून नदीत कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू

Ganpati Bappa 2025: उजवी की डावी? शास्त्रानुसार कोणत्या सोंडेचा गणपती बाप्पा घरी बसवणं असतं शुभ?

Today Gold Rate : गणेशोत्सवापूर्वी सोनं-चांदी महागली, सोन्याचे दर १००० तर चांदी २५०० रुपयांनी वाढले, आजचा भाव किती?

Maharashtra Live News Update: गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यातून चितळाचं सुरक्षित रेस्क्यू

मृत्यूशी झुंज अखेर संपली! दहीहंडी फोडताना चौथ्या थरावरून डोक्यावर पडला; पवईच्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

SCROLL FOR NEXT