Sunetra Pawar’s executive committee list triggers controversy, raising questions over Praful Patel’s role in NCP. saam tv
महाराष्ट्र

अजितदादांनंतर राष्ट्रवादीत 'पॉवर गेम'? पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटवलं? सुनेत्रा पवारांच्या पत्राने राजकीय भूकंप!

Maharashtra Politics: अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्या... अशातच राष्ट्रवादीत नवा पॉवर गेम सुरु झालाय... प्रफुल्ल पटेलांच्या नावासमोर कार्याध्यक्ष असा उल्लेख नसल्यानं कसा राजकीय वाद उफाळून आलाय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झालाय.... आणि याला कारण ठरलयं...निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवारांनी सादर केलेली राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी...राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर कुठल्याही कार्यकारणी पदाचा उल्लेख नसल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे केवळ राज्यसभा खासदार आणि सुनील तटकरेंच्या नावापुढेही लोकसभा खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे..तर पार्थ पवार याच्या नावापुढे 'जनरल सेक्रेटरी' आणि जय पवार यांच्या नावासमोर 'नॅशनल सेक्रेटरी' असा उल्लेख आहे. त्यामुळेच प्रफुल्ल पटेलांना कार्याध्यक्ष पदावरून हटवलं का याची चर्चा सुरू असतानाच पार्थ आणि जय पवारांना पक्षात बढती मिळाल्यानं विरोधकांना आयतीच संधी मिळालीय...

दुसरीकडे अजितदादांच्या पश्चात पक्ष 'टेकओव्हर' करण्याच्या प्रयत्नात असलेल्या नेत्यांना सुनेत्रा पवारांनी चाप लावलाय का? अशीही चर्चा रंगलीय.. मात्र यावर पक्षातील वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनी बोलणं टाळलयं.. राष्ट्रीय कार्यकारिणीची ही यादी चर्चेत आल्यानंतर खुद्द सुनेत्रा पवारांनीच त्यावर स्पष्टीकरण दिलयं...ज्येष्ठ नेत्यांची नावं यादीत नसणं ही केवळ एक क्लेरिकल मिस्टेक आहे. यादीत लवकरच सुधारणा केली जाईल.

असं विधान सुनेत्रा पवारांनी केलं..मात्र ही यादी समोर आल्यामुळे अजितदादांच्या निधनानंतर पटेल-तटकरे विरुद्ध पार्थ पवार असा सुप्त संघर्ष पक्षात सुरू आहे का? पक्षातील अनुभवी नेत्यांना बाजूला सारून नवी पिढी पक्षाचं नेतृत्व हाती घेण्याच्या तयारीत आहे का?अशीही चर्चा सुरू झालीय.. ही चूक खरोखरच कारकून स्तरावरची आहे की यामागे एखादी मोठी राजकीय खेळी? हे येणारा काळचं ठरवेल...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News : सोलापुरात ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई; १ कोटी ९० लाखांचे अंमली पदार्थ जप्त, मुंबई कनेक्शन उघड, ती महिला कोण?

SSC-HSC Supplementary Exam: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Wednesday Horoscope: कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता, ५ राशींना मिळणार उत्तम फळ; वाचा बुधवारचे राशीभविष्य

NEET चा पेपर कसा फोडला? 22 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला

Virar Crime: भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; विरार हादरलं!

SCROLL FOR NEXT