Sharad pawar  saam tv
महाराष्ट्र

NCP New President: पवारांचा उत्तराधिकारी कोण? विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास काय होईल? पक्षाच्या घटनेत काय आहे तरतुद?

Rashmi Puranik

Rashtrawadi congress party new president: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण होणार अशी चर्चा सुरू आहे. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी पक्षातील नेत्यांकडून अग्रह धरला जात आहे. परंतु पवार त्यांच्या निर्णयावर ठाम असून त्यांनी विचार कऱण्यासाठी वेळ घेतला आहे.

दुसरीकडे पवारांनी राजीनामा देताना नेमलेल्या समितीची येत्या 5 मे रोजी बैठक होणार असून त्यात अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीत शरद पवारांना अध्यक्षपदी ठेवण्याचा निर्णय घेतला जातो की नवीन पक्षाध्याच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहावं लागेल. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास काय तरतुद आहे, समिती नेमकी कशी काम करते आणि निर्णय प्रक्रिया कशी पार पडते हे जाणून घेऊया.

राष्ट्रवादीच्या घटनेत केलेल्या शिफारशीनुसार....

- पक्षाच्या अध्यक्षांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिला तर राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समिती पुढील निर्णय घेते.

- राष्ट्रीय कार्यकारणी आणि केंद्रीय निवडणूक समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यायची की नाही याबाबत चर्चा करेल.

- या दोन्ही समितींना राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता परस्पर चर्चा करून निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

- दोन्ही समितींमध्ये अध्यक्ष निवडण्याबाबत चर्चा झाली तर राष्ट्रीय कार्यकारणीची तत्काळ बैठक बोलवली जाईल.

- राष्ट्रीय कार्यकारणीतील सदस्य विशिष्ट परिस्थितीत राष्ट्रीय अधिवेशन न बोलवता एकमुखी निर्णय घेऊ शकतात. कमिटीला तसा अधिकार देण्यात आला आहे.

- कमिटी शिफारस करेल त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

- राष्ट्रीय अधिवेशन होईपर्यंत कमिटी प्रभारी अध्यक्ष देखील नेमू शकते.

- राष्ट्रीय अधिवेशन पार पडल्यानंतर अध्यक्षपदाची घोषणा अधिवेशनात केली जाईल.

- राष्ट्रीय कार्यकारणी समितीला विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास केवळ पक्ष हितासाठी प्रभारी अध्यक्ष न नेमता थेट अध्यक्ष नेमण्याची देखील तरतूद करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येक 3 वर्षांनंतर नव्या अध्यक्षाची निवड केली जाते. सध्याचे अध्यक्ष शरद पवार यांनी नव्याने अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर केवळ 8 महिन्यांचा कार्यकाल पूर्ण केला आहे. पक्षाच्या घटनेनुसार कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यकारिणी आणि केंद्रीय निवडणूक समिती पुढील निर्णय घेऊ शकते.

सुप्रिया सुळेंकडे अध्यक्षपद जाण्याची शक्यता....

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत सध्या अजित पवार (Ajit Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील आणि प्रुफल्ल पटेल ही चार नावं आघाडीवर आहेत. पण आता राष्ट्रवादीचे हे अध्यक्ष पद सुप्रिया सुळे यांच्याकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत साम टीव्हीला खात्रीलायक सुत्रांनी माहिती दिली आहे. यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील सुप्रिया सुळेंच्या नावाला पसंती देखील दिली आहे.

सुप्रिया सुळेंना पसंती मिळण्यामागील कारणं...

- दिल्लीतील राजकारणाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

- पक्षातल्या नेत्यांमध्ये सर्वसामान्य नेतृत्व म्हणून सुप्रिया सुळे यांची ओळख आहे

- देशातील सर्व मंत्री आणि सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांशी त्यांचा सलोखा आहे.

- सुप्रिया सुळेंच्या वागण्या बोलण्यात आदरपूर्वक नम्रपणा आहे.

- संसदेत परखड आणि अभ्यासू भाषणं करण्याची त्यांची क्षमता आहे.

- हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचे उत्तम प्रभूत्व आहे.

- शरद पवारांच्या तालमीमध्ये त्यांनी अनेक वर्षे काम केलं आहे. (NCP New President)

Edited By - Chandrakant Jagtap

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadanvis : पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नाने सोयाबीन भाव; फडणवीसांचा दावा

Bigg Boss Marathi Abhijeet Sawant: लांबसडक केस अन् साडी; अभिजीत बनला 'बाईss'; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले... काय हा प्रकार

Navratri 2024: नवरात्री स्पेशल उपवासाला बनवा बटाट्याचा शिरा; वाचा रेसिपी

KDMC News : पाणी मिळालं नाही, तर केडीएमसीला टाळे ठोकू; शिंदे गटातील नेत्याचा केडीएमसी अधिकाऱ्याला तंबी

Kalyan Crime : डिलिव्हरी बॉय, पण काम भयंकर, व्हिडिओ बघून सर्वच हैराण; CCTV पाहा

SCROLL FOR NEXT