Supriya Sule News SaamTV
महाराष्ट्र

Supriya Sule News : बहिणींनी लोकसभेत दणका दिला, म्हणून त्या लाडक्या झाल्या; सुप्रिया सुळेंचा खोचक टोला

Latur Rural News : राज्यातील बहिणींनी लोकसभा निवडणुकीत चांगला दणका दिला. म्हणून निकालानंतर त्या लाडक्या झाल्या आहेत. मात्र पंधराशे रुपये देऊन दुसरीकडे महगाई वाढवण्याचं काम या सरकारने केलं आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लातूरच्या सभेतून केली आहे.

Saam Tv

राज्यातली सगळ्यात जास्त लाडकी बहीण मी आहे. पण लोकसभेत असं नव्हतं. लोकसभेच्या निवडणुकीत सगळ्या बहिणींनी जोरात दणका दिल्यानंतर सगळ्या बहीणी लाडक्या झाल्या आहेत, अशी उपरोधक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज लातूर जिल्ह्यात प्रचारसभेच्यावेळी त्यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर हल्लाबोल केला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बहिणींना पैसे दिले, मात्र महागाई वाढवली असंही सुळे यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पक्षांकडून प्रचारसभांचा जोर वाढला आहे. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) यांच्या प्रचारासाठी शनिवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची महिला मेळावा आणि जाहीर सभा पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्यावर देखील त्यांनी टीका केली आहे.

‘छत्रपती आणि शाहू, फुले यांच्या महाराष्ट्रामध्ये अशी भाषा सातत्याने वापरली जाते आणि आता त्यांच्याकडे काहीच मुद्दे नाहीत, त्यामुळे हा देखील प्रयोग आहे. मात्र महाराष्ट्राने या आधी देखील लोकसभेला अशा विचारधारेचा निषेध केला आहे. आत्ताही करेल’, असंही सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या ईडीच्या वक्तव्यावर बोलताना आपल्या बोलण्याचा शिक्कामोर्तब त्या पुस्तकातून झालेलं असून याची शक्यता नाकारता येत नाही, असं म्हंटलं.

‘त्यांना इतिहास माहीत नाही..’

ज्यावेळी इतिहास माहिती नसतो तेव्हा सातत्याने अशी भाषा भाजपकडून वापरली जाते. यांच्या विचारधारेत सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं आहे. त्यामुळे दिल्लीवरून कोणीतरी अदृश्य शक्ती येते आणि महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान करून जाते, हे आम्ही आता खपवून घेणार नाही, अशी टीका अमित शहा यांच्या कालच्या सभेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे.

शरद पवारांवर बोललं की हेडलाईन होते, सुळेंचा राज ठाकरेंना टोला

राजकारणात महान संत शरद पवार जन्माला आले आणि राज्यात जातीय राजकारण व्हायला सुरुवात झाली, असं विधान राज ठाकरे (Raj Thackarey) यांनी लातूरच्या रेनापुर येथील सभेत गेल होतं. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. ‘गेल्या वीस वर्षापासून ते तीच टीका करत आहेत. त्यामुळे इतना तो हक्क बनता है ना, कारण शरद पवारांवर बोललं की हेडलाईन होते आणि लोकशाहीमध्ये एवढं मोठं मन माणसाने दाखवलं पाहिजे, असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिल आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT