Amol Kolhe Saam Digital
महाराष्ट्र

Amol Kolhe : संघर्षाची प्रेरणा या मातीतून मिळाली, मात्र..., संभाजी महाराज समाधीस्थळ विकास कार्यक्रमातून का निघून गेले अमोल कोल्हे?

Amol Kolhe News : छत्रपती संभाजी महाराज यांच्या वळू-तुळापूर येथील समाधीस्थळी आज महत्त्वाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार अमोल कोल्हे या कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेले होते.

Sandeep Gawade

Amol Kolhe

छत्रपती संभाजी महाराज यांच्या वळू-तुळापूर येथील समाधीस्थळी आज महत्त्वाचा शासकीय कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार अमोल कोल्हे या कार्यक्रमातून तडकाफडकी निघून गेले होते. त्यामुळे चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान कार्यक्रमातून निघून गेल्यानंतर त्यांनी यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. कार्यक्रमस्थळी फ्लेक्सवर नेत्यांचे फोटो झळकतात मात्र छत्रपती संभाजी महाराजांना फ्लेक्सवर स्थान ठेवलं नसल्याची खंत, खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. होमपिचवर बोलण्याची संधी दिली असती तर बरं वाटलं असतं. चालु भाषणांचा अनादर होऊ नये यासाठी दोन भाषणांच्यामध्ये निघून आलो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कार्यक्रमस्थळी राजकीय पक्षांची झेंडेबाजी सुरू आहे. छत्रपतींचा कार्यक्रम राजकीय इव्हेंट केला जातो, त्यामुळे हा सर्व भावना दुखावणार क्षण आहे. स्टेजवरील नेत्यांनी घरोघरी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहचविण्याचे काम केलं असेल असा टोला लगावत, पारनेर येथील शिवपुत्र संभाजी महानाट्य प्रयोगाला जाण्याची घाई होती, कार्यक्रमाला शंभुभक्त म्हणून उपस्थित होती. आजच्या भुमिपूजन कार्यक्रमातून राजकीय विचार न होता व्यापक दृष्टीकोन असता तर जास्त बरं वाटलं असतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

होमपिचवर बोलण्याची संधी दिली असती तर बरं वाटलं असतं. कारण छत्रपतींचा इतिहास तुमच्याकडून ऐकला, आमच्याकडुनही थोडा ऐकला असता तर बरं वाटलं असतं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर का होईना विकास आराखडा पुर्णत्वास जात आहे त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे आभार. पहिली मंजुरी अजित पवारांनी दिली. विरोधात असतानाही अजित पवारांनी ठाम भूमिका मांडली अभिमान आहे. अजित पवारांकडे आम्ही मोठ्या उंचीचा नेता म्हणून पाहतो. एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याला राजकीय प्रवास बदलावा लागत याची खंत अमोल कोल्हेंनी बोलून दाखवली.

चालु भाषणांचा अनादर होऊ नये यासाठी दोन भाषणांच्या मध्ये निघुन गेलो. निधी दिला तर इमारत उभी रहाते पण स्मारक उभं रहाण्यासाठी जिवंत चेतना लागते. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला जेव्हा ठेच लागते तेव्हा पेटून उठतो, या संघर्षाची प्रेरणा या मातीतून मिळाली, आता ती प्रेरणा स्मारकातून मिळेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT