Manoj Jarange Patil : पोलीस ॲक्शन मोडवर, मराठा आरक्षणाचे 'चलो मुंबई'चे बॅनर हटवण्यास सुरुवात; जरांगेंनी दिला इशारा

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटलांच्या बॅनर विरोधात पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळा गाव परिसरात लावलेले चलो मुंबईचे बॅनर, पोलीस प्रशासनाने काढण्यास सुरुवात केली आहे.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Saam Digital
Published On

Manoj Jarange Patil

मनोज जरांगे पाटलांच्या बॅनर विरोधात आता पोलीस प्रशासन देखील ॲक्शन मोडमध्ये आले आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील तांदळा गाव परिसरात लावलेले चलो मुंबई असा मजकूर असणारे बॅनर, पोलीस प्रशासनाने काढण्यास सुरुवात केली आहे. चकलांबा पोलीस ठाण्याच्या वतीने हे बॅनर काढण्यात येत असून या विरोधात मात्र मराठा बांधव आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहेत.

दरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी हे बॅनर आम्ही वरिष्ठांच्या आदेशाने काढत आहोत, गावात कुठेही साखळी उपोषण सुरू नाही, हे जुने बॅनर आहेत, त्यामुळे जर गावात साखळी उपोषण सुरू झालं तर नवीन बॅनर लावा, असं सांगितलं आहे. तर मराठा बांधवाने हे बॅनर आमच्यावर दबाव टाकून काढले जात असल्याचा आरोप केलाय.

बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनाचे पोस्टर हटवल्याने मनोज जरांगे पाटील यांनी जरांगे संताप व्यक्त केला आहे. नवीन पोलीस भरतीत 10 टक्के आरक्षणावरून होणार चांगली गोष्ट आहे, मात्र मागच्या आठ हजार मुलांचं काय? असप प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्या सरकारमुळे झाल्या. त्यात 302 चे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मराठा तरुणांच्या चौकशा बंद करा नाहीतर पोलीस स्टेशनसमोर येवून बसू आणि जाब विचारू, असा इशारा जरांगेंनी दिला आहे.

Manoj Jarange Patil
Namo Rojgar Melava : मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत; नमो रोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? जाणून घ्या

बोर्ड हटवनं ही तर भयानक गुंडगिरी आहे, आपण इंग्रजांच्या काळातही कधी अशी गुंडगिरी बघितली नसल्याचं म्हंटल आहे. पोरांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून दहशत निर्माण करायचं थांबवलं नाही तर सर्व मराठा बांधव घेवून पोलीस स्टेशनला येईल असा इशारा देखील जरांगे पाटालांनी पोलीस आणि गृह मंत्र्यांना दिलाय. त्याचबरोबर मी सागर बंगल्यावर जाणार म्हंटलं आणि तुम्ही कारवाई सुरू केली. त्यामुळे तुम्ही आमच्या रस्त्यानं जाल तर गुन्हे दाखल करू मग पोलीस कसे घेत नाहीत हे पाहू. असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil
Ajit Pawar News: महाराष्ट्रात १ नंबरचा तालुका करणार; तुमचा पाठिंबा हवा.. अजित पवारांची बारामतीकरांना साद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com