Rohit pawar and sharad pawar  saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar On Sharad Pawar: 'काँग्रेसच्या मनात शंका असेल तर...', शरद पवारांच्या भूमिकेबद्दल रोहित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं

Sharad Pawar Beed Sabha: शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महत्वाचे वक्तव्य केलं आहे.

Priya More

Chhatrapati Sambhaji Nagar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar Group) आणि अजित पवार गट (Ajit Pawar Group)असे दोन गट तयार झाले आहेत. शरद पवार गट महाविकास आघाडीसोबतच आहे. पण पक्ष फुटीमुळे दोन्ही गटातील नेत्यांच्या भेटीगाठी, तसेच शरद पवार आणि अजित पवार यांची गुप्त भेट यामुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) सध्या संभ्रमाचे वातावरण आहे.

अशामध्ये शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी महत्वाचे वक्तव्य केलं आहे. 'शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवाद आहे. काँग्रेसच्या मनात शंका असेल तर बीडमधून पवारसाहेब स्पष्ट करतील.', असे स्पष्ट मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.

रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांनी सांगितले की, '१७ तारखेला शरद पवार बीडला जाणार आहेत. त्याठिकाणी त्यांची एक जाहीर सभा होणार आहे. ही सभा खूप मोठी होईल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये संवाद सुरु आहे. काँग्रेसच्या मनात शंका असेल. बीडमधून पवारसाहेब स्पष्ट करतील.'

'भाजपची सत्ता राज्यात आणि केंद्रात आहे. त्यांच्याकडे कसे दबावतंत्र आहे हे सर्वांना माहित आहे. मी राजकारणात सत्तेत जाण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला विचार जपायचा आहे. लोकांच्या हितासाठी आम्ही कोणत्याही शक्तीला घाबरत नाही. अजित पवार अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांना कळते कोणाची भूमिका काय असेल. ज्या लोकांची भूमिका स्पष्ट आहे. त्यांना ते कसे संपर्क करतील.', असं अजित पवारांबाबत त्यांनी सांगितले.

'बीडनंतर शरद पवारांची पुण्यात सभा होईल. विदर्भातील कार्यकर्तेसुद्धा आग्रह करत आहेत. शरद पवार लोकांवर विश्वास ठेवणारे नेते आहेत. गेल्या निवडणुकीत आपण बघितले ज्यांनी शरद पवार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांना उत्तर जनतेच्या माध्यमातून पवारांनी दिले आहे. पवारसाहेब भूमिका बदलत नाही. ते आधी भाजपच्या विरोधात होते. आजही आहेत आणि पुढेही राहतील असा विश्वास कार्यकर्त्यांच्या मनात आहे. आम्ही लोकांमध्ये जायचे आणि विश्वास जिंकायचा मार्ग धरलाय. हा मार्ग सोपा नाही. भाजप आता कुठे तरी घाबरलेला आहे. म्हणून ते सध्या पक्ष फोडत आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे ते कुटुंब आणि पक्ष फोडत आहेत.', अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

यावेळी रोहित पवार यांनी पीएम मोदींवर देखील निशाणा साधला. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत‌. त्यांनी आजच्या भाषणात काही व्हिजन असणे अपेक्षित होते. युवा वर्गाला काही अपेक्षित होतं. त्यांचं भाषण म्हणजे एक राजकीय भाषण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज घराणेशाहीवर बोलले. मात्र भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे. त्यांना कुठेतरी चुकीची माहिती गेली. भाजप फक्त राजकारण करत आहेत. त्यांचे जे मोठे नेते आहेत ते घराणेशाहीतूनच आले आहेत.', अशी टीका रोहित पवारांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप नगरसेवकांचा अधिकाऱ्यांना घरचा आहेर

Baby Care : लहान बाळांच्या डोळ्यांना काजळ लावणे योग्य की अयोग्य? डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Supreme Court : पाकिटबंद खाद्यपदार्थाबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश, पाकिटावर येणार वेगवेगळे वॉर्निंग लेबल

Kidney Damage Causes: किडनीला हळूहळू खराब करतात या रोजच्या ७ सवयी; आजच करा बदल, अन्यथा वाढू शकतो धोका

Government Employees : सर्वसामान्यांची कामे रखडवली तर सरकारी कर्मचाऱ्यांना २५ हजारांचा दंड, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT