NCP Disqualification Case Saam TV
महाराष्ट्र

NCP Disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा तिढा लवकरच सुटणार; सुनावणीचे वेळापत्रक जाहीर

Ruchika Jadhav

Hearing Schedule:

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification) मोठी अपडेट समोर आली आहे. अपात्रताबाबत दाखल याचीकांवर सुनावणीचे वेळापत्रक जाहीर झालेय. अवघ्या १२ दिवसांत अजित पवार गटाचे वकील आणि शरद पवार गटाचे वकील विधिमंडळात कायदेशीर लढाई लढणार आहेत.

येत्या ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता याचिकांवर निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आलंय. ६ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत ही सुनावणी चालणार आहे.

आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक तयार

६ जानेवारी - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.

८ जानेवारी - याचिकेसाठी अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.

९ जानेवारी - फाईल्स किंवा अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. ९ तारखेनंतर ऎनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडली जाणार नाहीत.

११ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासणे.

१२ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.

१४ जानेवारी - सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.

१६ जानेवारी - विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.

१८ जानेवारी - प्रतिज्ञापत्र सादर करणे.

२० जानेवारी - अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

२३ जानेवारी - शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

२५ आणि २७ जानेवारी - राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya : नवरात्रीचा पहिला सोमवार तुमच्या राशीसाठी काय घेऊन आलाय?

Mahayuti News: हरियाणा-जम्मूमुळे महाराष्ट्रात महायुतीला टेन्शन? भाजपला फटका, काँग्रेसची सत्ता येणार?

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

SCROLL FOR NEXT