NCP Mulshi Pune : शरद पवार गटाचे पाैड बस स्थानकात आंदाेलन, एसटीच्या अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा

sharad pawar faction andolan : एसटीच्या विविध याेजनांचा प्रवाशांना लाभ हाेत नसल्याची खंत.
sharad pawar faction andolan for bus at paud stand
sharad pawar faction andolan for bus at paud standsaam tv
Published On

Mulshi News :

मुळशी तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात असणाऱ्या गावात पुण्याच्या स्वारगेट डेपोतून सुटणारी लालपरी मुळशी धरण परिसरात पुन्हा सुरू करावी अशी मागणी हाेऊ लागली आहे. या मागणीसाठी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) वतीने पौड एसटी बस स्थानकावर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.  (Maharashtra News)

गेली दोन ते अडीच वर्षे कोरोनापासून मुळशी धरण भागात एसटी महामंडळाने बस सेवा बंद केली आहे. कुंभेरी, पोंमगावं, भामुर्डे, तैलबैल, आणि वडुस्टे या अति दुर्गम मुळशी धरण भागातील कामगार, दूधवाले, भाजीपाला विक्री करणारे शेतकरी, शालेय विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिक तालुक्याच्या गावाला पौड येथे विविध कामासाठी येत असतात.

sharad pawar faction andolan for bus at paud stand
Satej Patil: कूठल्या विद्वानाने हे डाेकं चालवलं! 'राजाराम'चा निर्णय अन्यायकारक, सतेज पाटील आक्रमक

दोन वर्ष झालेली एसटी बसची सुविधा पुन्हा सुरु करावी यासाठी मुळशीकरांनी वारंवार पुणे स्वारगेट बस डेपो मॅनेजरला निवेदन दिले. परंतु त्यास सकारत्मक प्रतिसाद मिळाली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने (sharad pawar faction) आंदोलन छेडले.

ग्रामीण भागाची धमणी लालपरी पुन्हा सुरू करावी अन्यथा यापेक्षाही मोठं जन आंदोलन उभारू एसटी बस डेपोच्या अधिकाऱ्यांना काळे फासू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी एसटी महामंडळाला दिला.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सरकारने महिलांना हाफ टिकीट आणि 75 वर्षां पुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास दिला. मात्र एसटी बस बंद असल्याने या योजनेचा काय फायदा असा सवाल ज्येष्ठ नागरिकांनी एसटी महामंडळाला केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

sharad pawar faction andolan for bus at paud stand
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानी मंदिरात दर्शन पासचा काळाबाजार; पुजारी मंडळाचा गंभीर आराेप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com