MLA Disqualification Saam Digital
महाराष्ट्र

MLA Disqualification: राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी २२ जानेवारीला? अध्यक्षांच्या कामकाजाचा कोर्टाकडून आढावा घेतला जाण्याची शक्यता

NCP MLA Disqualification: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्राप्रकरणी २२ जानेवारी पर्यंत सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्याचे अध्यक्षांना निर्देश देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती.

Sandeep Gawade

NCP MLA Disqualification

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्राप्रकरणी २२ जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्याचे अध्यक्षांना निर्देश देण्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. त्यानंतर कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना ३१ जानेवारीपर्यंत अपात्रतेप्रकरणी निकाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यावरून अध्यक्षांच्या कामकाजाचा कोर्टाकडून आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

येत्या ३१ जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता याचिकांवर निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुनावणीचे वेळापत्रक तयार करण्यात आलंय. ६ जानेवारी ते २७ जानेवारी या कालावधीत ही सुनावणी चालणार आहे.

आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीचे वेळापत्रक तयार

६ जानेवारी - राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये याचिका आणि त्यावरील उत्तराची कागदपत्रे एकमेकांना सोपविली जातील.

८ जानेवारी - याचिकेसाठी अतिरिक्त माहिती जोडण्यासाठी वेळ.

९ जानेवारी - फाईल्स किंवा अतिरिक्त कागदपत्रे पटलावर आणणे. ९ तारखेनंतर ऎनवेळी कोणतीही नवी कागदपत्रे जोडली जाणार नाहीत.

११ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी. पहिल्या दिवशी शरद पवार गट अजित पवार गटाकडून सादर झालेली कागदपत्रे तपासणे.

१२ जानेवारी - याचिकेशी संबंधित कागदपत्रांची पाहणी आणि पडताळणीचा दुसरा दिवस. अजित पवार गटाकडून शरद पवार गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी केली जाईल.

१४ जानेवारी - सुनावणीच्या कामकाजात कागदपत्रांचा समावेश करण्यासाठी किंवा एखादे वगळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

१६ जानेवारी - विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसमोर पहिली प्रत्यक्ष सुनावणी. सुनावणीचे विषय नक्की केले जातील.

१८ जानेवारी - प्रतिज्ञापत्र सादर करणे.

२० जानेवारी - अजित पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

२३ जानेवारी - शरद पवार गटाच्या साक्षीदारांच्या उलटतपासणी

२५ आणि २७ जानेवारी - राष्ट्रवादीच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांचे अंतिम युक्तीवाद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anagha Atul: भरपावसात साडी नेसून अनघा अतुलचं बोल्ड फोटोशूट, Photos

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Healthy liver color: निरोगी लिव्हरचा रंग कसा असतो?

Mumbai Rain: मुंबईत कोसळधार! चेंबूरमध्ये पालिका रुग्णालयाबाहेर ४ फुटांपर्यंत पाणी, रुग्णांना खांद्यावरून नेण्याची वेळ; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT