Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Saam TV
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदाराची हजेरी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> भारत नागणे

पंढरपूर : राजकीय नेत्यांचं एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं ही आता सामन्य बाब झाली आहे. त्यामुळे कधी कोण कुठे जाईल याचा नेम नाही. राष्ट्रवादीचा एक आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकी सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा आमदार भाजपच्या वाटेवर आहे का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतलेल्या बैठकीत माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांनी हजेरी लावली आहे. आमदार शिंदे यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कार्तिक यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. (Latest Marathi News)

आज त्यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा संदर्भात शासकीय विश्रामगृहावर विविध शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेतली. या बैठकीला भाजप आणि शिंदे गटाचे सर्व आमदार उपस्थित होते. त्यांच्या समवेत माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे हे देखील उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मागील दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील यांनी दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोन्ही आजी-माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी चपाती ऐवजी 'या' पोळ्या खा; झटपट बारीक व्हाल

Thane Election Voting LIVE : नरेश म्हस्के यांनी बजावला मतदानाचा हक्क, विजयाचा व्यक्त केला विश्वास

Yoga For Asthma: दम्यावर रामबाण उपाय सापडला;विरासन केल्याने घेता येईल मोकळा श्वास

Mumbai Water Storage: मु्ंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार; धरणांतील साठ्यात मोठी घट, १५ जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा

Curry Leaves Water: कढीपत्त्याचं पाणी आरोग्यासाठी गुणकारी

SCROLL FOR NEXT