Amol Mitkari tweet saam tv
महाराष्ट्र

५० खोके एकदम ओके, आता काय 'या' बैलाला शिंगावर घेणार का? मिटकरींच्या ट्विटमुळं खळबळ

पावासाळी अधिवेशन नुकतेच संपले पण विरोधकांकडून सरकारचे वाभाडे काढणे सुरुच आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्य विधीमंडळाचे पावासाळी अधिवेशन नुकतेच संपले खरे पण विरोधकांकडून सरकारचे वाभाडे काढणे सुरुच आहे. 'पन्नास खोके एकदम ओके' विरोधकांनी अशा जोरदार घोषणा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर अधिवेशनात निशाणा साधला होता. यावरून राजकीय वातावरण तापलं आणि शिंदे गटातील आमदार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी झाली. अशातच आता पोळा सणाच्या निमित्तानेही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करून शिंदे गटाला पुन्हा एकदा डीवचलं आहे. पोळा सणानिमित्त बैलावर ५० खोके ओके लिहून शिंदे गटातील आमदारांना विरोधकांनी धारेवर धरले आहे. आता काय या बैलाला शिंगावर घेणार का? मी तर म्हणतो आणि घेऊनच बघा, असं ट्विट करत मिटकरींनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.

बीड येथील गाव खेड्यातही पोळ्यानिमित्त बैलांच्या मिरवणुकी काढण्यात आल्या. या मिरवणूकीत नागरिकांचं लक्ष वेधलं ते बैलांच्या पाठीवर लिहिलेल्या एका खळबळजनक विधानानं. बैलांच्या अंगावर 50खोके एकदम ओके, असं लिहून मिरवणूक काढण्यात आली. या माध्यमातून विरोधकांनी शिंदे गटातील मंत्र्यांना लक्ष करून बीडमध्ये अनोख्या स्वरूपात हा बैलपोळा साजरा केला.विशेषतः बीडच्या हिंगणी हवेली गावात हा अनोखा बैलपोळा साजरा करण्यात आला असून याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्याच पावसाळी अधिवेशनात शिंदे गटातील आमदारांची विरोधकांनी कोंडी केली. पन्नास खोके एकदम ओके, विरोधकांनी अशा घोषणा देत सत्ताधाऱ्यांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे-फडणवीस सरकारवर घेरले होते. विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळं यंदाच्या पावसाळी अधिवेशन वादळी झालं.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: मिथूनसह ५ राशींचे मन अस्वस्थ राहिल! नुकसान होईल, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Pune Tourism : महाराष्ट्रात राहून परदेशाचा अनुभव घ्यायचाय? मग दिवाळीच्या सुट्टीत पुण्याजवळील 'हे' ठिकाण पाहाच

Maharashtra Live News Update: सांगली पोलिसांकडून 1 कोटी 11 लाख सहाशे रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त

Horoscope: आजचा दिवस आनंद, सुख समृद्धीचा; ६ राशींच्या जीवनात घडणार मोठा बदल, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

पुणे पोलिसांचा दणका! निलेश घायवळनंतर सख्खा भाऊ सचिनवरही मकोका, VIDEO

SCROLL FOR NEXT