Sakshi Sunil Jadhav
कौटुंबिक वातावरण चांगले राहील. तिखट, मसालेदार खाण्याची आपली आवड आज जास्त तीव्र होईल. धनाशी निगडित असणारे व्यवहार पार पडतील.
आरोग्य चांगले राहील. मानसिकताही उत्तम आहे. या दोन्ही गोष्टी चांगल्या राहिल्यामुळे दिवस आनंदाचा दिसतो आहे.
खर्च करण्यासाठी आज आपला हात सढळ असेल. कदाचित दिवसाच्या शेवटी त्याबद्दल थोडे वाईटही वाटेल.
प्रेमाने सगळ्यांना आपलेसे करणारी तुमची रास आहे. मैत्रीचे बंध दृढ होतील. दिवस चांगला आहे.
ताठ मानेने जगायला आपल्याला आवडते. व्यवहाराला आपण कायम दक्ष असता. आज याला दूजोरा मिळेल. कामाच्या क्षेत्रात प्रगती आहे.
बौद्धिक असणारी आपली रास नवनवीन गोष्टींच्या उत्खननामध्ये आज प्रवास होतील. सुवर्ता कानी येतील.
अपार कष्ट असा काहीसा दिवस आहे." कशासाठी पोटासाठी" अशी आपली रास नसून "कशासाठी पैशासाठी" अशी काही आपली मानसिकता आहे.
व्यवसायामध्ये नवनवीन गोष्टी अमलामध्ये आणाल. येणारे अडथळे चुटकीसरशे बाजूला साराल. लक्षात ठेवा.
सुरू होणाऱ्या गोष्टीला शेवट असतो हे समजून जावे लागेल. "धीर धरे धीरापोटी फळे रसाळ गो मटी" ही पंक्ती आज लक्षात ठेवा.
अनाकलनीय घटना घडण्याचा आजचा दिवस आहे. अकल्पित काहीतरी चांगले आपल्या वाट्याला येईल.
वाहन सौख्य उत्तम राहील. नवीन खरेदी काही करणार असाल तर आज सर्व सुखाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
व्यवसायामध्ये वृद्धीच्या संधी येतील. जाहिरात क्षेत्रात प्रगतीचे योग आहेत. दिवस संमिश्र आहे.