''काँग्रेसने स्वबळाचा नारा न देता दोन पावले मागे यावे''
''काँग्रेसने स्वबळाचा नारा न देता दोन पावले मागे यावे'' - Saam Tv
महाराष्ट्र

''काँग्रेसने स्वबळाचा नारा न देता दोन पावले मागे यावे''

जयेश गावंडे

अकोला : साम सकाळच्या सर्व्हे वर आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी म्हणाले महाविकास आघाडी जर एकत्र निवडणुका लढली तर भाजपचे सुडाचे राजकारण हे संपुष्टात येईल. आगामी निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनाही एकत्र राहवेच लागेल कारण या तिघांचेही एकत्र येणे हे राज्याच्या दृष्टीने काळाची गरज असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले. स्वबळाचा नाऱ्याने जर भाजपचा फायदा होत असेल तर काँग्रेसने स्वबळाचा नारा न देता दोन पावले मागे येऊन अडमुठपणाची भावना काँग्रेसने सोडून द्यावी असेही मिटकरी म्हणाले.

दरम्यान सकाळ आणि साम संपुर्ण राज्यभरात सर्व्हे केला आणि त्यात राज्यातील जनतेने आपला कौल महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनतेने उद्धव ठाकरे यांना कौल दिला आहे. काल रात्री साम टीव्हीवर झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थीत होते. त्यात अनेकांनी आपले मत नोदंवले की आगामी काळात महाविकास आघाडीनेच सोबत निवजणूक लढावावी. त्याचबरोबर यापुर्वीचे मित्र भाजप आणि शिवसेना युती पुन्हा नको असे म्हणणाऱ्या मतदारांचा टक्का जास्त आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील सर्वात मोठा पक्ष हा भाजप ठरला आहे. मागच्या विधानसभा निवडणूकीत भाजपच्या १०५ जागा निवडणून आल्या होत्या. आताचा कल पाहता राज्यातील जनतेने भाजपला १०० च्या वर जागा दिल्या आहेत. परंतु राज्यत महाविकास आघाडीचं सरकार असावं असं बऱ्याच जनतेला वाटते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT