Sharad Pawar rules out NCP merger with any political party latest statement saam tv
महाराष्ट्र

NCP Merger: 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही'; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला शरद पवारांकडून ब्रेक

NCP Merger: आता बातमी आहे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात शरद पवारांनी विलिनीकरणासंदर्भात स्पष्ट भूमिका घेतलीयविलिनीकरणाबाबत पवार नेमकं काय घोषणा केलीय? दादांच्या राष्ट्रवादीनं शरद पवारांच्या विधानावर काय प्रतिक्रिया दिलीय,पाहूयात या रिपोर्टमधून.

Suprim Maskar

गेल्या काही महिन्यांपासून राज्यात शरद पवारांची राष्ट्रवादी भाजपप्रणीत NDA आघाडीत सामील होणार आणि दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार, अशा चर्चांना उधाण आलं होतं. पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या घेतलेल्या भेटीमुळे या चर्चांना अधिकच बळ मिळाले होतं मात्र, मुंबईत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात 'आम्ही कुणासोबतही जाणार नाही, यायचं असेल तर आमच्यासोबत या' असं जाहीर करत शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना पूर्मविराम दिलाय.

तर खासदार सुप्रिया सुळेंनीही विरोधात बसणं जास्त योग्य आहे, असं म्हणत एनडीए आघाडीत सामील होण्याच्या चर्चांना केराची टोपली दाखवलीय. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दादांच्या राष्ट्रवादीला विलिनीकरणाची खुली ऑफर दिलीय...तर दादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी पवारांच्या टाईमिंगवर भाष्य केलंय.

आता शरद पवारांच्या स्पष्ट भूमिकेमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळालाय. मात्र दोन्ही गटातील कार्यकर्त्याची विलिनीकरणाची इच्छा काही लपून राहिलेली नाही. राष्ट्रवादीचा एक गट सत्ताधाऱ्यांसोबत तर दुसरा विरोधकांसोबत असल्यानं विलिनीकरणाचं राजकीय गणित जुळवणं कठीण जात असल्याची चर्चा आहे.

राजरकारणात टायमिंगला महत्त्व असतं. आणि हे टायमिंग पवारांपेक्षा कुणाला उत्तम माहित असणार? त्यामुळे पवारांनी विलिनीकरणाला ब्रेक लावण्याची जाहीर भूमिका घेतली असली तरी यावर आता दादांच्या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT