Political NCP : माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांची थेट औरंगजेबाशी तुलना केली होती. यावरुन आता राष्ट्रवादीचे काँग्रेसच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेता. निलेश राणे दिसतील तिथे त्यांच्या कानाखाली वाजवा, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी म्हटलं आहे.
बाबा गुजर यांनी काय म्हटलं?
निलेश राणे (Nilesh Rane) दिसतील तिथे त्यांच्या कानाखाली वाजवा. निलेश राणे यांच्या कानाखाली लगावणाऱ्याला बक्षीस देखील असल्याचंही गुजर यांनी जाहीर केलं आहे. जो निलेश राणे यांच्या कानाखाली वाजवेल त्याला 1 लाख रुपयांचे बक्षीस गुजरांनी जाहीर केलं आहे.
निलेश राणेंनी वादग्रस्त ट्वीट डिलिट करावे
निलेश राणे यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त ट्वीट डिलिट करावे. निलेश राणेच्या वादग्रस्त ट्वीटबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपने माफी मागावी. येत्या 24 तासात कारवाई केली नाही तर उद्या पोलिस स्टेशनमध्ये जेल भरो आंदोलन करणार, असल्याचा इशारा महेश तपासे यांनी दिला आहे.
ट्वीट दुर्भावनापूर्ण हेतूने
'औरंगजेब' या नावामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरात तणावाचे वातावरण आहे, हे माहित आहे. तेच नाव निलेश राणे पद्मविभूषण श्री शरद पवार, खासदार-राज्यसभा यांच्या विरोधात वापरत आहेत. या ट्वीटमध्ये दुर्भावनापूर्ण हेतू आहे. त्यामुळे यावर कारवाई झाली पाहिजे, अशा मागणी क्लाईड क्रास्टो यांनी केली आहे.
निलेश राणेंचं वादग्रस्त ट्वीट
निवडणुका आल्या की शरद पवार साहेब मुस्लीम समाजाबाबत चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंजेबाचा पुर्नजन्म म्हणजेच शरद पवार, असं वादग्रस्त ट्वीट निलेश राणे यांनी केलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.