Supriya sule saam tv
महाराष्ट्र

Supriya Sule: फडणवीस जेव्हा-जेव्हा गृहमंत्री झालेत तेव्हा क्राइम रेट वाढला; सुप्रिया सुळेंची टोकाची टीका

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय.

Bharat Jadhav

Supriya Sule In Y B Chavan Centre :

नागपूर क्राईम कॅपिटल झालं आहे, ते जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम रेट वाढतो, अशी टीका सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. त्या महिला पदाधिकारी मेळावा बैठकीत बोलत होत्या. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने ही मेळावा बैठक आयोजित करण्यात आली होती. (Latest News)

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर टीका केली. राज्याची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातील महिला सुरक्षित नाहीत. ते जेव्हा गृहमंत्री होतात तेव्हा-तेव्हा नागपूरमधील क्राईम रेट वाढतो, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. आर.आर. पाटील राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा महिला सुरक्षित होत्या. पण सध्या नागपूर क्राईम कॅपिटल झाले आहे.

दरम्यान, अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी त्यांचा फोटो वापरू नये म्हणून सांगितलं होतं. त्यानंतर अजित पवार गट आपल्या कार्यक्रमात शरद पवाराच्या फोटोऐवजी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा फोटो वापरत आहे. यावर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्याचं सरकारमध्ये यशवंतराव चव्हाण यांचा फोटो मोठा होत आहे. त्यांची आठवण केली जाते.

कारण हेडगेवारांच्या नावाने मतं मिळत नाहीत, म्हणून यशवंतरावांचे नाव घेतात. चव्हाण साहेबांनी कधीच सुडाचं राजकारण केलं नाही. परंतु त्यांचे नाव घेऊन सध्याच्या सरकारमधील लोकं सुडाचे राजकारण करत आहे, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताला आणखी एक मोठा झटका, टॅरिफनंतर ६ कंपन्यांवर घातली बंदी

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणातील सर्व आरोपी कोर्टात दाखल

"तू xxx@# आहेस... तू आम्हाला मानत नाही का..?" शेतावरून वाद, तरूणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

New Bride Tips: नव्या नवरीने घरसंसार सांभाळताना टाइम मॅनेजमेंट कसं करावं?

Famous Actor Arrested : प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; कंपनीला घातला ५ कोटींचा गंडा, ७ वर्षांपासून होता गायब

SCROLL FOR NEXT