Tanvi Pol
लग्नानंतर नव्या नवरीच्या आयुष्यात मोठा बदल होतो.
नवीन घर, नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या आणि त्याचसोबत स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचं एक अवघड पण सुंदर आव्हान उभं राहतं.
अशा वेळी टाइम मॅनेजमेंट ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी असते.
सकाळपासून रात्रीपर्यंत कोणती कामं कधी करायची हे आधीपासून ठरवून ठेवा
सगळ्या कामांना एकाच वेळी करायचा प्रयत्न केल्यास गोंधळ उडतो. त्यामुळे कोणते काम आधी करणे आवश्यक आहे.
दररोज किंवा आठवड्याच्या सुरुवातीला एक यादी बनवा, ज्यात प्रत्येक दिवशी करायची कामं लिहा.
घरसंसार सांभाळताना स्वतःला हरवून बसू नका. थोडा वेळ वाचन, संगीत, योगा, स्किन केअर किंवा छंदासाठी ठेवा