Solapur News: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Maharashtra Deputy Minister Ajit Pawar) यांच्यामध्ये शनिवारी गुप्तभेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अशामध्ये शरद पवार यांनी या गुप्त भेटीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'अजित पवार आणि आमच्यातील भेट गुप्त नव्हती. अजित पवार माझा पुतण्या आहे. कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात गैर काय?', अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
सांगोल्यामुळे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार यांनी सांगितले की, 'ते मला भेटायला आलेत यात कसली चर्चा. आम्ही भाजपसोबत जाण्याचा प्रश्न नाहीच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही. असा प्रयत्न आमचे हितचिंतक करतात. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझ्या भूमिकेत बदल होणार नाही. आमच्यातील सहकाऱ्यांची भूमिका वेगळी आहे.' तसंच, अजित पवार गटातील काही जण दु:खी असल्याचेही त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीच्या बैठकीबद्दल शरद पवारांनी सांगितले की, 'पुढील रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. 31 तारखेला मुंबईत प्राथमिक अजेंडा ठरवणार आहोत. 30 ते 40 नेते एकत्र येतील. ही बैठक मी आणि उद्धव ठाकरे यांनी ठरवली आहे.' तसंच, 'भाजपची विचारधारा आमच्या चौकटीत बसत नाही. भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. आम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनता लवकरच महाविकास आघाडीच्या हातात सत्ता देईल.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवारांनी यावेळी मोदी सरकारवर देखील निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'सीमा भागातील प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. मणिपूर प्रश्न महत्वाचा आहे. तो सेन्सिटीव्ह आहे. आता पर्यंत संसदेत गांभीर्याने घेतात. दुर्दैवाने पंतप्रधान यांनी त्याला महत्व दिलं नाही. पंतप्रधानांनी राजकीय हल्ले केले. लोकसभेला मतदान होईल त्यावेळी सगळे दिसेल. सध्या ईडीचा वापर करून काम चालू आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.