Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar Exclusive: अशी झाली राजकारणात एन्ट्री; खुद्द शरद पवारांनी सांगितला किस्सा...

Sharad Pawar News : शरद पवारांचा राजकारणात प्रवेश कसा झाला, याबद्दल पहिल्यांदाच त्यांनी मोठा खुलासा केला आहे.

मंगेश कचरे

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद गोविंदराव पवार (Sharad Pawar) यांचे नाव राज्यासोबत देशाच्या राजकारणामध्ये प्रमुख आणि प्रभावशाली नेत्यांमध्ये घेतले जाते. शरद पवार हे 82 वर्षांचे झाले आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील 55 वर्षे राजकारणाला दिली आहेत. त्यांचा राजकीय कारकिर्दीतील अनुभवाला खूप महत्व आहे.

या वयातही तरुणांनाही लाजवेल असा उत्साह शरद पवारांमध्ये आहे. त्यांच्या राजकारणातील अनुभवाचे आजही कौतुक केले जाते त्याचसोबत महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या विचारांना खूप महत्व दिले जाते. मात्र शरद पवारांचा राजकारणात प्रवेश कसा झाला, याबद्दल पहिल्यांदाच त्यांनी मोठा खुलासा केला आहे. (Sharad Pawar Exclusive)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि जेष्ठ नेते शरद पवार यांनी साम टिव्हीला EXClusive मुलाखत दिली. यावेळी बोलताना पवारांनी त्यांच्या राजकारणातील प्रवेशासोबतच अनेक रंजक किस्सेही सांगितले. या मुलाखतीत शरद पवार यांनी त्यांनी राजकारणाची करियर म्हणून निवड केली का केली, याबद्दल मोठा खुलासा केला.

काय म्हणाले शरद पवार...

"मी शाळेत शिकत असताना, माझे वडील बंधू आप्पासाहेब पवार यांनी प्रवरानगरला राहायला पाठवलं. त्यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत नववीला प्रवेश केला.याच काळात गोव्यात पोर्तुगीज चळवळ चालू होती. या लढ्याला महाराष्ट्रातून विरोध होत होता. हा विरोध सुरू असतानाच मोठा हिंसाचार झाला, यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये हेगडेवार मृत्युमुखी पडले. यानंतर शाळा पडली, ज्यानंतर हेगडेवार यांना श्रद्धांजली देत राजकारणाला सुरुवात झाली," असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

तसेच यावेळी बोलताना शरद पवार यांना राजकारणात आला नसता तर कोणते क्षेत्र निवडले असते? असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना शरद पवार यांनी "हे सांगणे कठीण आहे, मात्र मला अभ्यास करायला अजिबात आवडत नव्हते," असे सांगितले. तसेच या मुलाखतीत पवार यांनी ICC तसेच BCCI मध्ये असतानाचे अनेक अनुभवही शेअर केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

SCROLL FOR NEXT