Rupali Thombare Patil NCP Saamtv
महाराष्ट्र

Rupali Thombare: 'स्वतः शेण खाता अन् दाऊदशी संबंध जोडता, तुम्हाला लाज वाटली पाहिजे; शिंदे गटाच्या खासदारावर रुपालीताई संतापल्या

'राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका आहे' असेही रुपालीताई म्हणाल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Rupali Thombare Patil On Rahul Shewale: शिंंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी एका फॅशन डिझायनरचे शोषण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या प्रकरणावर खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेत सदर महिलेचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम तसेच पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचा खळबळजनक खुलासा केला होता.

राहुल शेवाळे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राहुल शेवाळे यांना लाज वाटली पाहिजे अशा शब्दात सडकून टिका केली आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाने केलेल्या आरोपांवर उत्तर देताना संबंधित महिलेचे पाकिस्तान तसेच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कनेक्शन असल्याचा आरोप केला होता. तसेच तिला राष्ट्रवादीचा (NCP) सपोर्ट असल्याचाही आरोप केला होता. राहुल शेवाळे यांच्या या वक्तव्यावर रुपाली ताई ठोंबरे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे.

यावेळी बोलताना, "राहुल शेवाळे स्वतः शेण खातात आणि महिलेचा संबंध दाऊदशी जोडतात, असे बोलताना त्यांना लाज वाटायला पाहिजे," अशा शब्दात त्यांनी राहुल शेवाळेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. तसेच 'राहुल शेवाळेंवर आरोप करणाऱ्या महिलेच्या जीवाला धोका आहे' असेही त्या म्हणाल्या.

याबद्दल अधिक बोलताना रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी, "एकीकडे राहुल शेवाळे महिलेचे दाऊदशी (Daud Ibrahim) संबंध असल्याचा आरोप करतात तर दुसरीकडे तिच्याशी संबंधही ठेवतात. त्यामुळे राहुल शेवाळे यांनी दाऊदच्या जवळच्या व्यक्तीशी संबंध ठेवून देशविरोधी माहिती पुरवली असा अर्थ घ्यायचा का?" असा सवाल केला.

तसेच , "राहुल शेवाळे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊदशी संबंध नाही पण ते तसे म्हणत असतील तर त्यांनी देशाच्या विरोधात काम केल्यामुळे शेवाळेंनाच अटक व्हायला पाहिजे," असेही रुपालीताई म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elvish Yadav-Engaged 2 : महिलेचा टी-शर्ट काढला, आंघोळ घातली अन्...; एल्विश यादवच्या शोमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEOS पाहून नेटकरी भडकले

Latur Crime : सख्खा भाऊ पक्का वैरी! धाकट्या भावनेचं काढला थोरल्या भावाचा काटा; कारण ऐकून व्हाल थक्क

Accident : भीषण अपघात! ट्रेलरची PCR गाडीला धडक, ५ पोलिसांचा जागीच मृत्यू, ३ जखमी

Viral Video: वधू-वरासह लग्नाचा संपूर्ण स्टेज कोसळला; AI च्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ

Daily Walk Time: दिवसाला किती चालणं शरीरासाठी फायद्याचे ठरेल? वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती

SCROLL FOR NEXT