Jitendra Awhad - Eknath Shinde, maharashtra politics SAAM TV
महाराष्ट्र

CM Eknath Shinde : सर सलामत तो...; हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँडिंगच्या घटनेवर जितेंद्र आव्हाडांचा CM शिंदेंना सल्ला

Jitendra Awhad - Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल, गुरुवारी सातारा येथे जात असताना खराब हवामानामुळं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jitendra Awhad - Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल, गुरुवारी सातारा येथे जात असताना खराब हवामानामुळं हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं होतं. या घटनेवरून माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री साहेब आपल्यात राजकीय मतभेद जरूर आहेत. मी हे विसरू शकत नाही की आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते, असं आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल गुरुवारी सातारा येथे जात होते. मात्र, खराब हवामानामुळं त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. या घटनेवरून जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना सल्ला दिला आहे. यासंबंधी त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्री साहेब, आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री (Chief Minister) होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते. काल आपण हट्टाने हेलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणत असताना, त्याला हवामान खराब असल्याचे सांगितले जात असताना देखील त्याला हेलिकॉप्टरने गावी जाण्यासाठी उड्डाण घेण्यास सांगितले. आपण हेलिकॉप्टर साताऱ्याला उतरवलत, नंतर आपण कुठे गेलात हे मला माहीत नाही, असे आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं.

हवामान खराब असताना कधीही हेलिकॉप्टर उडवू नये हे जागतिक अलिखित संकेत आहेत. आपण हे का केलेत ते मला माहीत नाही. पण, हे असं करणं महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या वैयक्तिक दृष्टीने चुकीचे आहे. 'सर सलामत तो पगडी पचास' अशी एक म्हण प्रचलित आहे, असा अप्रत्यक्ष सल्लाही आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला.

आपण अशी भूमिका घेणे किंवा असा हट्ट धरणे हे मला वैयक्तिकरित्या पटलेले नाही. कारण कोणी काहीही म्हणो आपण एकेकाळचे चांगले मित्र होतो. ह्या नात्यानेच मी हे लिहीत आहे. असे पुन्हा कधीही करू नका, असेही आव्हाडांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: मालाडमधील छटपूजेच्या आयोजनावरून मनसेचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

Life Hacks : परफेक्ट सकाळ बनवायचीये ? मग ही एक सवय आजच लावा! नाहीतर सकाळी सकाळी होइल प्रचंड धावपळ

SCROLL FOR NEXT