NCP leader Jayant Patil
NCP leader Jayant Patil  saam tv
महाराष्ट्र

Jayant Patil News: 'कुछ तो मजबूरीयां रही होगी, यू ही कोई बेवफा नही होता' जयंत पाटलांची तूफान फटकेबाजी

Chandrakant Jagtap

Maha Vikas Aghadi Nagpur Vajramuth Sabha: नागपूर येथे आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. यासभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी तूफान फटकेबाजी केली. 'कुछ तो मजबूरीयां राही होगी, यू ही कोई बेवफा नही होता' असा शेर म्हणत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्र आज वाट बघतोय की कधी निवडणुका लागतात. आता सरकार देखील निवडणूका घेईना झालंय. सरकारला या अथांग जनसागराची धडकी भरली आहे. महाराष्ट्र सरकारला जर आपण जनतेत लोकप्रिय आहोत असं वाटत असेल तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेपासून ते राज्यातील सगळ्या निवडणुका घेऊन दाखवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, त्यांची छाती नाहीये, हे सरकार निवडणूकांना घाबरतंय. या सरकारला लोकांपुढं जाण्याची इच्छा नाहीये त्यामुळे आता अलिकडच्या काही दिवसांत इव्हेंट करण्याचे कार्यक्रम होत आहेत. लोकं कशामुळे जमतील हे पाहून ते कार्यक्रम घेतात. तिथे जाऊन उभे राहतात आणि आमची लोकप्रियता किती आहे हे दाखवतात. पण महाराष्ट्र काही दुधखुळा नाही असा टोला जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे साहेब जे सोडून गेले त्यांना गद्दार म्हणतात. पण उद्धवजी मला आपल्याला सांगायचं आहे की, 'कुछ तो मजबूरीयां राही होगी, यू ही कोई बेवफा नही होता'. काहीतरी अडचण असेल, कुठेतरी नस दाबली असेल, काहीतरी मजबूरी असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल, समजलो अब क्या करेंगे, असे म्हणत जयंत पाटलांनी शिवसेनेला (शिंदे गट) टोला लगावला.

नरेंद्र मोदी जवाब दो! पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

पृथ्वीराज चव्हाण या सभेत बोलताना म्हणाले आहेत की ''पंतप्रधान यांचं ज्यांच्यावर विशेष प्रेम होतं, ज्यांना चार वेळा राज्यपाल केलं गेलं आणि त्या वेळेचे जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. 14 फेब्रुवारी 2019 मध्ये भारतीय जवानांवर जो हल्ला झाला, बॉम्ब स्फोटाने 40 जवान शहीद झाले. त्या हल्ल्याबद्दल काही तथ्य त्यांनी पुढे मांडली.''

''हजार सीआरपीएफ जवानांना जम्मू येथे घेऊन जायचं होतं. विमानाची मागणी केली, दिलं नाही. 300 किलो स्फोटक घेऊन वाहने शेजारी फिरत होती. सुरक्षा यंत्रणांना कळलं नाही. त्या 40 शहीद जवानांच्या मृत्यूला कोण जबाबदार आहे. आज देशातील जनता नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारत आहे. नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी जवाब दो!" असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले; पर्यटक आणि भाजपच्या नेत्यावर गोळीबार

Relationship Tips: लग्नाआधी भावी जीवन साथीदाराला विचारा 'हे' ३ प्रश्न; नाहीतर आयुष्यात येतील दुःख

Chandu Champion Trailer: कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचा 'चॅम्पियन' ट्रेलर रिलीज

ED कडून थेट अटक करण्यावर आता बंधनं, PMLA वर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

SCROLL FOR NEXT