Eknath Khadase Home Saam Tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या घरी जबरी चोरी, कपाटं फोडून चोरट्यांकडून मुद्देमाल लंपास

Eknath Khadase Home: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी मोठी चोरी झाली आहे. मुक्ताईनगर येथील घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

Priya More

Summary:

  • एकनाथ खडसे यांच्या घरी मोठी चोरी

  • जळगावच्या मुक्ताईनगर येथील घरी चोरी

  • जळगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास केला सुरू

  • चोरट्यांनी घरातील कपाटं फोडून मुद्देमाल लंपास केला

संजय महाजन, जळगाव

जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरी मोठी चोरी झाली. जळगावच्या मुक्ताईनगरमधील निवासस्थानी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. खडसेंच्या जळगावमधील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली. लाखोंचा मुद्देमला चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. जळगाव पोलिस तपास करत आहेत.

चोरट्यांनी एकनाथ खडसे यांच्या घरातील तळ मजला आणि पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे. चोरट्यांनी खडसेंच्या घरातील सर्व सामान अस्थव्यस्थ केले आहे. कपाटामधील कपडे, पर्स इतर वस्तू चोरट्यांनी खाली फेकून दिल्या आहेत. या चोरीच्या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

नेमकं चोरट्यांनी किती मुद्देमाल चोरून नेला ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनास्थळी जळगाव पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर देखील चोरीची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सोलापुरातील येडेश्वरी साखर कारखाना शेतकरी संघटनेने बंद पाडला

BMC Election: मविआत दगाफटका, उद्धव ठाकरेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचं आव्हान

Maharashtra Weather: नववर्षाचं स्वागत पावसाने, मुंबईत पहाटेपासून बरसल्या सरी; राज्यभर थंडीचा कहर, आज कुठे कसं हवामान?

Nail Art Designs : पार्टी, ऑफिस आणि कार्यक्रमासाठी करुन बघा हे नवीन हटके नेल आर्ट्स डिझाइन

Fruits: नवीन वर्षात दररोज ही खा 5 फळे, वर्षभर राहाल फिट आणि फाईन

SCROLL FOR NEXT