Eknath Khadse’s Jalgaon residence looted; thieves flee with gold and cash, police investigation underway. saam tv
महाराष्ट्र

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

Eknath Khadse House Looted in Jalgaon: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे जळगाव येथील निवासस्थानी दरोडा पडला आहे. चोरांनी लाखोंचे सोने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय.

Girish Nikam

  • काही दिवसांपूर्वी खडसेंच्या सुनेच्या पेट्रोलपंपावर दरोडा पडला होता.

  • चोरांनी सोनं आणि रोकड लंपास केली आहे.

  • पोलिसांनी तपास सुरू करून सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावातील घरावर दरोडा पडलाय. त्यात सोनं आणि रोकड लंपास झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच खडसेंच्या सुनेच्या पेट्रोलपंपावर दरोडा पडला होता. सत्ताधारी खडसेंवर निशाणा साधत असताना आता चोरही खडसेंच्याच मागे लागल्याचं चित्र आहे. पाहूया एक रिपोर्ट.

राष्ट्रवादीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या राजकीय विरोधकांमुळे नव्हे तर चोरांमुळे बेजार झाले आहेत. कारण जळगावच्या शिवरा नगरमधील त्यांच्या घरावर दरोडा पडलाय. खडसेंच्या घरातून 7 तोळ्याच्या 4 अंगठ्या, 1 किलोची चांदीची गदा, चांदीचं त्रिशुळ, 1 किलो 200 ग्रॅमचे 6 ग्लास, 2 किलोची तलवार आणि 35 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आलीय.

घर बंद असताना ही घटना घडली आहे. मात्र त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. चोरटे परिसरातील एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे पोलीस गस्तीच्या वेळीच ही चोरी झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर चोर आणि त्यांच्या दुचाकीचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेनंतर साम टीव्हीशी बोलताना खडसेंनी संताप व्यक्त केलाय. जळगाव जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय असा हल्लाबोल केला.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी खडसेंच्या सून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडला होता. त्यात रोकडसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. आता एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा पडलाय. त्यामुळे आमदार-खासदारांची घरे सुरक्षीत नाहीत तर सामान्य नागरिकांचं काय?असा सवाल उपस्थित केला जातोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Alert : ‘मोंथा’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला तडाखा! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, कोणत्या जिल्ह्यात कोसळधार?

Bihar Chhath Puja : छठ पूजेच्या उत्सवावर दु:खाचा डोंगर, बिहारमध्ये ८३ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Auspicious Yog Today: आज कार्तिक शुक्ल सप्तमी; बुध ग्रहाची कृपा आणि चंद्राचा मकर प्रवेश ठरणार शुभ

Beach Travel: गर्दीपासून सुटका हवीये? पर्यटकांना भुरळ घालणारे ८ सर्वाधिक स्वच्छ समुद्रकिनारे, एकदा भेट द्याच

SCROLL FOR NEXT